उदाहरणें फारच थोडी असत. मुसलमानी राज्यांत जुलमानें किंवा अन्य तऱ्हेने बरेच लोक मुसलमान झाले; पण जे हिंदु राहिले त्यांची वृत्ति हिंदुधर्मासंबंधाने दल- प्रमाणे चंचल झालेली नव्हती. इंग्रजी राज्यांत आम्हांस जे शिक्षण मिळत आहे तें अशा प्रकारचे नाही. राज्यकर्त्यांचा धर्म परकीय असल्यामुळे त्यांनी धार्मिक शिक्षणाच्या कामी औदासिन्य पतकरलें आहे; आणि त्यामुळे आमच्या शाळा म्हणजे व्यवहाराकरितां उपयुक्त माणसे तयार करण्याच्या कारखान्याप्रमाणे निवळ व्यावहारिक संस्था होऊन राहिल्या आहेत. अशा प्रकारचे शिक्षण आज तीन चार पिढया आम्हांस मिळत आहे. धार्मिक शिक्षण देण्यास स्वतंत्र संस्था समाजांतील लोकांनी निर्माण करण्यास कांहीं हरकत नव्हती. पण तसा प्रयत्न कोणी केला नसल्याने सुशिक्षित वर्गाची प्रत्येक पिढी अधिकाधिक व्यावहारिक व उपयुक्ततावादी होत चालली आहे; आणि त्यांच्यामध्ये व इंग्रजी न शिकलेल्या लोकांमध्ये विचा- रार्चे अंतर उत्तरोत्तर अधिकाधिक होत चाललें आहे हा परिणाम राजाच्या किंवा मिशनरींच्या दृष्टीनें कदाचित् इष्ट असेल, पण राष्ट्रीयदृष्ट्या देशांतील सुशिक्षित- वर्ग आणि सामान्य लोक यांच्या विचारांत अशा प्रकारचा भेद होऊन दोषांमधील अंतर अधिकाधिक वाढावें हें अत्यंत अपायकारक होय. जुन्या काळीं विद्वान् किंवा ज्ञानी पुरुष यांचा वर्ग नव्हता असें नाहीं. पण ते समाजापासून इल्लींच्याप्रमाणे कधीं अलग राहात नसत. किंबहुना समाजाची सुधारणा कर- ण्यास लोकांमध्ये मिसळून त्यांस उपदेश केला पाहिजे असें त्यांस वाटत असे व त्याप्रमाणे ते आपले आचरणही ठेवीत. हल्लींच्या सुधारकवर्गाच्या समजुती या- पेक्षां अगदी निराळ्या आहेत. धर्मसंबंधाने त्यांची स्थिति काय आहे हे सर्वोस उघड दिसत आहे. आमच्या प्राचीन धर्मग्रंथाचे कधींही अवलोकन केलेले नसल्यामुळे व लहानपणापासून सर्व शिक्षण व्यावहारिक रीतीनें झालेले असल्या- मुळे इंग्रजी शाळेतून तयार झालेल्या मनुष्यास धर्म म्हणजे काय, तो कशाकरितां पाहिजे, राष्ट्राच्या उन्नतीस त्याची कांहीं अवश्यकता आहे कीं नाहीं याबद्दल त्यास कांहीं एक माहीत नसतें. समाजांत प्रचलित असलेल्या कांहीं सामाजिक किंवा धार्मिक रीतिभाती तो वरपांगी पाळीत असतो. पण त्यावरील त्याची श्रद्धा बहुतेक समूळ नाहींशी झाली असल्यामुळे या रीतिभाती जरा कोठे नडूं लागल्या की, हे राजश्री त्या झुगारून देण्यास एका पायावर तयार असतात. आणि अशा वेळी जर का त्यास कोणी कांहीं बोललें कीं, मिल्ल, स्पेन्सर किंवा बेकन यांच्या जोरावर बरेच वाक्पांडित्य करण्यास हे तयार असतात. धार्मिक किंवा सामाजिकरीत्या आपला विशिष्टपणा कायम राखण्याकरितां कांहीं प्रसंगी अड- चणही सोसावी लागते व अशा प्रकारच्या अडचणी सोसण्यास लोकांस तयार करणें है धर्मशिक्षणाचे एक अंग आहे, ही कल्पनाही यांच्या मनांत नसते. हल्ली ज्या लोकांनी सामाजिक सुधारणेचे काम हातीं घेतलें आहे ते बहुतेक याच वर्गातील आहेत. धर्मशिक्षणापासून एका प्रकारचें जें मानसिक धैर्य येते ते
पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/395
Appearance