३८१
यांच्या आंगांत मुळींच नाहीं. इतकेच नव्हे तर धर्माकरितां हे मुळींच काळजी करीत नाहींत. याचे ढळढळीत उदाहरण पाहाणे असल्यास फार लांब जाव- यास नको. मिशनरी लोकांनीं जागोजाग ख्रिस्ती संस्था स्थापन करून हिंदु- लोकांस ख्रिस्ताच्या कळपांत ओढण्यासाठी ते जारीने प्रयत्न करीत आहेत; व दुष्काळ हा आम्हांस साहाय्य करण्याकरितांच आकाशांतील बापाने हिंदु- स्थानात पाठविला, असेंही सर्वांनी कृतीने व कांहींनीं कंठरवानें जगास जाहीर केले आहे. ही स्थिती हिंदुधर्माच्या दृष्टीनें शोचनीय होय. याबद्दल कांही मत- भेद असेल, असें आम्हांस वाटत नाहीं. पण विधवाविवाहाकरितां जितकी ओरड होते तितकी ओरडही ह्या बाबतीत होत नाहीं, मग उद्योग कोठला ! उलट सर्व देश ख्रिस्ती झाला तर बरेच झाले, असे मानणारे हल्लींच्या सुधारक वर्गाच्या पुढाऱ्यांत कांही लोक आहेत. अशा लोकांनीं सामाजिक सुधा- रणेबद्दल केलेली ओरड लोकांस ग्राह्य न झाल्यास त्यांत लोकांचा तरी काय दोष ? सुधारणा करणे ती धर्माच्या पायावर करा, असें आम्ही कां म्हणतो याचें कारण यावरून दिसून येईल. दहापांच युरोपियन लोकांनी एकत्र जमून आमच्या सामाजिक रीतीभातींची चर्चा केली किंवा दहापांच हिंदूंनी एकत्र जमून युरोपियन लोकांच्या सामाजिक सुधारणेची जर चर्चा केली तर ती अनुक्रमे हिंदूस किंवा युरोपियन लोकांस जितकी ग्राह्य वाटेल तितकीच प्रस्तुतच्या सुधारकांची सामाजिक चर्चा हिंदु- समाजास मान्य होईल, असे म्हणण्यास काही हरकत नाहीं, हे सुधारक जन्मतः व वरपांगी हिंदु आहेत खरे, पण विचाराने आणि शिक्षणाने हे धर्मदृष्टया बहुतेक परकीयच बनले आहेत, असे लोक समजतात, आणि लोकांचा हा समज पुष्कळ अशी साधार आणि खराही आहे. अशा स्थितीत समाजाची सुधारणा होण शक्य नाहीं; इतकेंच नव्हे तर झाली तर तीही अनिष्टकारकच होईल हे लक्षांत ठेविले पाहिजे. हिंदुस्थानांत हल्लींच्या काळीं तीन चार धर्म प्रचलित आहेत, म्हणून हिंदुधर्मास राष्ट्रीयत्व नाहीं है म्हणणे चुकीचे आहे. केवळ लोकसंख्येच्या मानाने पाहिले तरीही हिंदूंचाच समुदाय मोठा आहे; व एवढा मोठा समुदाय ज्या बंधनाने एकत्र झाला आहे तें हिंदुत्व हेंच होय. हे बंधन मोडून टाकणें किंवा त्याची उपेक्षा करून दृढ न राखर्णे म्हणजे हिंदुस्थानांतील दोनतृतीयांश प्रजा वाळूच्या कणांप्रमाणे सैरावैरा मोकळी सोडणे होय. अशा रीतीनें हिंदुत्व मोडल्याने राष्ट्रीय दृष्ट्या पुढे चांगले परिणाम होतील, असें जर कोणास वाटत असेल तर तो निवळ भ्रम आहे. हिंदुस्थानांतील तीस कोटि प्रजेस एकत्र कर ण्यास हिंदुत्वाखेरीज दुसरीही कांहीं साधने पाहिली पाहिजेत, हे खरे आहे. पण त्याच्याबरोबर हेंही लक्षांत ठेविले पाहिजे कीं, तीस कोटिपैकी वीस कोटि प्रजा हिंदुत्वानें एकत्र झालेली आहे व त्यांचे बंधन कायम ठेवणे हेच राष्ट्रीय दृष्ट्या अधिक सोईचे, शक्य आणि जरूर आहे. सारांश,