पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/378

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हर्बर्ट स्पेन्सर, ३६३ विद्वान् लेोकांपेक्षांही पुढे गेलेले होते हें येथे वाचकांनीं लक्षांत ठेविले पाहिजे. उदाहरणार्थ, डार्विनसाहेबांनीं जीवकोटींतील उपजातीसंबंधानें उत्क्रांतीमताचे निरूपण करण्यापूर्वीच तें मत स्पेन्सरसाहेबांनी काढलेले होतें ही गोष्ट आतां सर्वास मान्य आहे. तत्त्वज्ञान म्हणजे सर्व शास्रांतील सिद्धान्ताचे एकीकरण करून तद्वारां सृष्टीच्या मुळाशी असलेल्या आदितत्त्वाचे निदान करणे आणि त्या तत्त्वांची विकृति कशी होते तें ठरविणें हें होय; असें स्पेन्सर साहेबांनीच त्याचे लक्षण केलेले आहे. या लक्षणाप्रमाणें तत्त्वज्ञ होण्यास जगांतील सर्व शास्त्रांची करतलामलवत् माहिती असणें जरूर आहे. आणि तसें ज्ञान स्पेन्सरसाहेबांच्या अंगात वसत होतें ही गोष्ट त्यांच्या सिद्धान्ताचा विचार करतांना विसरतां कामा नये अशा रीतीनें जें ज्ञान प्राप्त झालें त्याच्या साहाय्यानें स्पेन्सरसाहेबांनीं प्रथमत:असे ठरविलें आहे कीं, जगांत द्रव्य ( Matter ) आणि गति किंवा शक्ति ( Force ) अशीं दोनच आदितत्त्र्वे आहेत. या दोन तत्त्वांत आणि सांख्यांच्या प्रकृति आणि पुरुषांत थोडासा मतभेद आहे तो पुढे सांगूं. गति किंवा शक्ति आणि द्रव्य ही दोन्हीही तत्त्वें परस्परांशी संलग्न असून त्यांच्या वियोगाचे ज्ञान मनुष्यास होणे शक्य नाहीं; करितां त्यांचा संयोग अविनाशीच कल्पिला पाहिजे, असें स्पेन्सरसाहेबांचे मत आहे. तथापि, ज्याअर्थी द्रव्याचे ज्ञान होण्यास त्याचा इंद्रियावर आघात व्हावा लागते त्या अर्थी द्रव्य व शक्ति या दोन्ही परस्परसेलग्न तत्त्वांस गति किंवा शक्तीलच स्पेन्सरसाहेब अधिक प्रामाण्य देतात. द्रव्य आणि गति यांची साम्यावस्था असते तेव्हां जें जगाचे स्वरूप तें मूल स्वरूप होय. परंतु ही साम्यावस्था चिरस्थायी नसल्यामुळे तिचा समतोलपणा आपेोआपच नाहींसा होतो, आणि तो नाहींसा झाल्यावर ह्यांच्या विषम संयोगार्ने सृष्टींतलि नानाप्रकारचे भेद उत्पन्न होतात. उत्क्राति ज्यास म्हणतात ती हीच होय.सामावस्थेची विषमावस्था होणे किंवा अभेदापासून भेदोत्पत्ती होणें हें उत्क्रांतीचे मुख्य लक्षण होय. आणि या तत्त्वाप्रमाणें उत्क्रांती होऊँ लागली म्हणजे द्रव्याचीं भिन्न भिन्न स्वरूपं होऊन त्यापैकीं प्रत्येक स्वरूप पूर्णतेस पोहोचतें. या पूर्णतेस द्रव्य व गती याचे * तत्कालीन समतोलन’ असें स्पेन्सरसाहेबांनीं म्हटले आहे. पण हें समतोलनही कायमचे टिकत नाहीं आणि तें बिघडले म्हणजे पुन्हा अपक्रांतीस सुरवात होते, आणि पुन्हां द्रव्य आणि शक्ति हीं साम्यावस्थेस येऊन पोहोचतात. द्रव्य व गति यांच्यामध्ये हा जेो व्यापार चालू आहे तोच जगाच्या प्रवृत्तीचे कारण होय. आणि हें त्याचे अांदोलन ( खेळ) जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत जगामध्ये काही ठिकाणीं अपक्रांति चालू राहावयाचीच असें स्पेन्सरसाहेबांचे मत आहे. यावरून गतीसंयुक्त जड द्रव्यच स्पेन्सरसाहेबांच्या मताप्रमाणें सृष्टीचे मूलकारण होय असें कित्येकांस वाटण्याचा संभव आहे; पण खरा प्रकार तसा नाहीं. द्रव्य म्ह्णजे काय, शक्ति म्हणजे काय, हीं दोन्हीं ज्या पदार्थात अधिष्ठित झालेली आहेत त्याचे स्वरूप कोणतें, आणि काल व दिशा इत्यादि ज्या द्रव्याच्या नित्य संयुक्त उपाधि