पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/332

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मराठे आणि वेदोक्त कर्म. ३ १७ मोडून टाकून सर्व हिंदुस्थानांतील जातींचा सबगेलेकार करणें इष्ट असले तरी शेंकडेौं वर्षेपर्यंत शक्य नाहीं हें कोणासही कबूल केले पाहिजे; व आम्हीं आजच्या प्रश्नाचा जो विचार करणार आहों तो याच धोरणावर करणार आहॉ. समाजाच्या स्थितीत जी कांहीं कोणास पालट करावयाची असेल ती व्यवस्थेनें व बेताबातानेच केली पाहिजे, व जी पालट करावयाची तीही अशी असली पाहिजे कीं, तिची उपयुक्तता चटकन लोकाच्या लक्षात येईल. हल्लीं वेदोक्तकर्माबद्दल जी चळवळ चालू आहे ती तशा प्रकारची नाही हें पूर्वेतिहासावरून कोणाच्याही सहज लक्षांत येईल. हा इतिहास कित्येकास अवगत नसल म्हणून त्याची आज खालीं थोडक्यांत हकिगत देत आहाँ. ज्ञातिधर्माप्रमार्णे पाहृतां ब्राह्मणं, क्षत्रिय, वैश्य यांस ज गृह्य संस्कार सागिातलेले आहेत ते वेदोक्त मंत्रानें करावे अशी स्मृतींतून वचनं आहेत. परंतु धर्मशास्रावरील जे प्रसिद्ध व सर्वमान्य ग्रथकार आहेत त्यांच्यामते खया क्षत्रिय व वैश्य या जाती हल्लीं नाहींशा झालेल्या आहेत; व ब्राह्मण आणि खरोखर शूद्र यांच्या दरम्यान ज्या जाती आहेत त्यांचे जे संस्कार करणें ते वरील तारतम्य लक्षांत आणून केल पाहिजेत असे त्यांचे मत आहे. आता प्रश्न असा आहे कीं, मराठे हे अस्सल क्षत्रिय आहेत किंवा शूद्र आहेत, अथवा या दोहॉमध्यें तारतम्यानें यांची कोणती तरी पायरी लाविलीच पाहिजे. पूर्वपक्ष असा आहे कीं, मराठे हे क्षत्रिय होत आणि त्यामुळे त्याच्याकडे होणारी कर्मे ब्राह्मणांनी * वेदोक्त' केलीं पाहिजत. परंतु ही कोटी नवी आहे असें नाहीं. इतिहासाकडे जरा नजर फॅकली असतां असे दिसून येईल कीं, यवनी राज्याची लाट उत्तरेकडून दक्षिणेकडे जेोरानें खाली येत असतां तिला विंध्याद्रीप्रमाणे अडवून धरून ज्या रणशूर मराठे वीरानें माघार खावयास लाविली आणि आपल्यास गोब्राह्मणप्रतिपालक असें अन्वर्थ नाव घेऊन हिंदुधर्माचे, हिंदुराष्ट्राचे आणि हिंदु लोकाचे अस्तित्व कायम राखलें त्याच्या कारकीर्दीत या प्रश्नाचा एकदां निकाल झालेला आहे. ती काल असा होता कीं, श्रीशिवाजीमहाराजास कोणत्या रीतीने वरिष्ठ स्थान देतां येईल; त्यांस उच्चपद, उच्चमान, उच्च अधिकार कोणत्या रीतीनें मिळतील, हें महाराष्ट्रातील प्रत्येक पुरुष तेव्हां कृतज्ञताबुद्धीने पाहत होता. काशातील ज्या भट्ट घराण्यांत निर्णयसिंधु, मयूख, प्रयोगरत्न इत्यादि प्रसिद्ध ग्रंथाचे कर्ते निपजून त्यांच्या हातून सोळाव्या व सतराव्या शतकांत हिंदु ज्ञातिधर्माचे पुनरुज्जीवन किंवा सस्थापन झाले व ज्या घराण्यांतील पुरुषांस अद्यापही काशीक्षत्रीं अग्रपूजेचा मान आहे त्याच घराण्यांतलि स्वत:वर सांगितलेल्या पुरुषांच्या योग्यतेचेच विद्वान् ग्रंथकार श्रीगागाभट्ट हे त्या वेळीं दक्षिणेत येऊन त्यांच्या हस्र्ते, त्यांच्या देखरेखीखाली आणि त्यांच्या सल्लयार्ने, आणि त्या वेळच्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध ब्राह्मण, शेणवी, परभू, मराठे वगैरे ज्ञातीच्या मुत्सद्दयांच्या व शूर पुरुषांच्या संमतीनें,किंबहुना सर्व महाराष्ट्राच्या अनुकूलतेनें व इच्छेनें