पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/319

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ ० ४ लो० टिळकांचे केसरींतील लेख ॐ ज्ञेयाज्ञेयमीमांसा. विलायतेंतील प्रसिद्ध तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या * आदितत्त्वें ’ या ग्रंथावरून रा. रा. नारायण लक्ष्मण फडके यानीं केलेल्या अज्ञेयमीमासेचे मार्गे केसरीत एकदां परीक्षण आलेलेच आहे. याच प्रसिद्ध इंग्रज ग्रंथकाराच्या सदर ग्रंथाचा उत्तरार्ध म्हणजे ज्ञेयमीमासा याचे मराठीत भाषातर किंवा सार दोन पुस्तकांच्या रूपानें रा. रा. दाभोकळर यानीं प्रकाशित केलेल्या ग्रंथमालेंत प्रसिद्ध झालें असून तें आमच्याकडे येऊन बरेच दिवस झाले. असल्या तञ्हेचे तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ मराठींत उतरण्याचे फारसे प्रयत्न अद्याप झाले नसल्यामुळे रा. रा, फडके यांस स्पेन्सरसाहेबाचे विचार मराठीत व्यक्त करण्यास बराच त्रास पडला असेल यांत शंका नाहीं. तथापि विषयाचे गाभीर्य लक्षांत आणता रा. रा. फडके याचा प्रयत्न बराच सिद्धीस गेला असून त्यांचा ग्रंथ वाचण्यासारखा झाला आहे असें म्हणण्यास आम्हांस कांही एक हरकत दिसत नाही. काहीं ठिकाणीं विषयाच्या अपरिचितपणामुळे सामान्य वाचकास किंवा अर्वाचीन युरेपिअन शास्त्राची ज्यास विशेष ओळख नाहीं अशा गृहस्थःस ग्रंथ कठीण वाटेल; पण असले ग्रंथ केवळ मनेारंजनार्थ नसतात हे लक्षात ठेवून पुनः वाचण्याची तसदी घेतल्यास हो। त्याची अडचण दूर होणार आहे. “ नियमबद्धतेची सार्वत्रिकता ” (Uuiformity of law ) वगैरे प्रकारचे काहीं शब्द निराळ्या त-हेर्ने रचता आले असते. तथापि अशा प्रकारचे शब्द फारच श्रेडेि आहेत व तत्त्वज्ञानासारख्या गह्नविषयाची ज्यास ओळख करून घ्यावयाची असेल-मग ती संस्कृतातून असो वा मराठीतून असो-त्थानें असल्या शब्दास भिऊन उपयोगी नाही. शब्दातीत अज्ञेयाची कल्पना शब्दानी व्यक्त करणें किती अवघड आहे हें * नेति, नेति, ’ या श्रुतीवरून सहज ध्यानात येण्यासारखे आहे. तसेच विश्वांत ज्या अनेक घडामोडी चालल्या आहेत त्या ज्या सामान्य नियमांच्या अनुरोधार्ने होतात त्या सामान्य नियमाचे आकलन होऊन ते शब्दानीं बरोबर व्यक्त करणे इतकें दुष्कर आहे कीं, इंग्रजी सारखी सुधारलेली भाषा व स्पेन्सरसारखे तत्त्वज्ञानी यांची गांठ पडली असताही स्पेन्सरसाहेबास कांहीं ठिकाणी आपल्या मनातील विचार बरोबर रीतीनें व्यक्त करण्याकरतां नव्या कृत्रिम शब्दाची योजना करावी लागली आहे. अशा विषयावरील ग्रंथाचे मराठी भाषातर किंवा सारांश थेोडाबहुत कठिण होणारच, पण ज्यास जुन्या वेदांतापलीकडे जाऊन त्याचे सिद्धात व पाश्चिमात्य आधुनिक शास्त्राचे तद्विविषयक सिद्धांत यांची तुलना करावयाची असेल त्यानें स्पेन्सरच्या ग्रथाचे अध्ययन केले पाहिजे. तसें अध्ययन करण्यास मराठी वाचकास रा. रा. फडके याच्या ग्रंथांनीं चागली सोय झाली आहे व हो करून दिल्याबद्दल रा. रा. फडके यांचे आम्ही आभनंदन करितीं. आपल्या

  • (केसरी-ता. ७ मे १९०१ ).