पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/318

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कै. विष्णुशास्री चिपळूणकर. ३०३ मालिख मा लिख मा लिख ? अशी विधात्याची प्रार्थना करूनच त्यांची रजा घेणें आधिक प्रशस्त होय. असो; शास्रीबुवांनी काय कामगिरी केली याच्यासंबंधानें ऐतिहासिकदृष्टया विवेचन करण्याचा आतां काल आलेला आहे एवढेच मात्र विशेर्षे करून आपणांस सांगणें आहे. शास्रीबुवांस ज्या गोष्टींचे निराकरण करावें लागलें त्या गोष्टी कोणत्या हें समजून घेतल्याखेरीज त्यांच्या लेखाची योग्यता समजणे कठीण आहे. इंग्रजी शिकलेल्या पहिल्या पिढीची स्थिति जी वर वर्णन केलेली आहे तिचे बंड कमी होण्यास इग्रजी शिकलेल्या लोकाची नोकरीच्या दृष्टीनें किंमत कमी होत चालली हें एक कारण तर खरेंच, पण शास्रीबुवाचे लेख हें त्याहूनही बलवत्तर कारण आहे. समाजाचे व्यवस्थित स्वरूप कायम ठेवूनच जी कांहीं सुधारणा करणे असेल ती केली पाहिजे व इंग्रजी शिकल्यानें सर्वज्ञता येते असें न मानतां, उद्योग, सदाचरण, नियमितपणा, देशाभिमान वगैरे गुण संपादन करण्याचा सुशिक्षितांनी प्रयत्न केला पाहिजे अशी जर आज थेोडीबहुत समजूत झाली असली तर तिचे प्रवर्तकत्व शास्रीबुवांकडेसच येतें. गेल्या पाच पंचवीस वर्षात राष्ट्रीय सभेसारख्या ज्या चळवळी झाल्या, त्यामुळे व इतर अनेक कारणांमुळे लोकाचे डोळे बरेच उघडत चालले आहेत हें खरै आहे; पण इंग्रजी शिक्षणाच्या पहिल्या घोटाबरोबर जो अव्यवस्थितपणाचा मद आला होता तो शास्रीबुवानीं दूर केला हें आपणांस कबूल केले पाहिजे. अशा प्रकारें एकदां एका बाजूस वळलेल्या ओघास केवळ आपल्या लेखणीनें अडवून धरून लोकप्रवृति, सदाचार व खरा देशाभिमान यांजकडे वळविणें हें कांहीं लहानसहान काम नव्हे व तें ज्यार्ने अवघ्या ३२ वर्षाच्या वयांत केले त्याची योग्यताही सामान्य लोकांच्या योग्यतेपेक्षां पुष्कळच अधिक असली पाहिजे हें कोणाही प्रांजल बुद्धीच्या मनुष्यास कबूल करावें लागेल. शास्रीबुवांच्या बरोबरीच्या व तदुत्तरकालीन लोकस्थितीचे ऐतिहासिकदृष्टया विवेचन करण्याची वेळ आलेली नाहीं. पण ती येईल तेव्हां शास्रीबुवांच्या कर्तबगारीबद्दल त्यांस योग्य मान मिळून इंग्रजी शिक्षणार्ने आमच्या मंडळीच्या मनांत पहिल्यानें उत्पन्न झालेला चंचलपणा उत्तरोत्तर कमी होऊन स्वधर्म, स्वभाषा, स्वदेश व विशेषत: करून आपल्या देशांतले व प्रांतांतले लोक याच्यासंबंधानें सुशिक्षित मंडळी आपलें कर्तव्य ओळखण्यास लागली; व नीति, सदाचार आणि निश्चय यांच्या आश्रयार्ने तें कर्तव्य ते पार पाडू लागले असे म्हणण्याची पाळी येईल अशी मला उमेद आहे. मीं जें विवेचन केले आहे तें अद्याप बरेंच अपूर्ण आहे. तथापि, तेवढ्यानें या विषयाची ऐतिहासिक दृष्टया चर्चा करण्याची लोकांची प्रवृत्ती होईल तर माझ्या अल्पश्रमाचें चीज झालें असें मी समजेन. sammensus ysningsmam")