पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/311

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९६ लो० टिळकांचे केसरींतील लेख ष्करण करण्याचा जी मान मिळाला तो ते ज्या कालीं जन्मले त्या कालाचे फल होय, शास्रीबुवाच्या इच्छेचे नव्हे. कारण, शास्रीबुवा नसते तर दुसरा कोणी तरी पुरुष या कार्यास त्या काळीं खचित प्रवृत्त झाला असता. नुसत्या इंग्रजी शिक्षणार्ने दहापांच नव्या कल्पना मनात शिरल्याबरोबर कोणताही पुरुष समाजाचा पुढाकार घेण्यास पात्र होतो ईो कल्पनाच चुकीची हेोय; व या कल्पनेच्या पायावर ज्या चळवळीची इमारत उभारली गेली होती त्या चळवळी केव्हांना केव्हा तरी खालीं पडणे अगदी स्वाभाविक होते. शास्रीबुवानीं त्या पाडल्या असें म्हणण्यापेक्षा त्याचे दिवस संपायची वेळ आणि शास्त्रीबुवाच्या कारकीदींचा प्रारंभ एक झाला हें म्हणणे अधिक सयुक्तिक होय. शास्त्रीबुवांनीं या चळवळींतील पाँचटपणा ताबडतोब ओळखून तिकडे आपल्या लेखाचा मोर्चा फिरविला, हें त्याच्या मार्मिकपणाचे व प्रसंगावधानाचे फल आहे; व त्याच्या ठिकाणी त्या वेळीं दुसरा कोणीही पुरुष असता तरी त्यानें असेच वर्तन केलें असतें. वरील हकीकतीवरून सवंग लोकप्रियता मिळविण्याकरिता शास्त्रीबुवांनी आपल्या वेळच्या चळवळीवर हल्ला केला असा जेो कित्येकाचा आक्षेप आहे तो किती निरर्थक आहे हें सहज दिसून येईल. शास्त्रीबुवानी ज्या चळवळीवर हल्ला केला त्याचा पेोकळपणा व त्याच्या पुरस्कत्र्याच्या वर्तनाचा अव्यवस्थितपणा लोकाच्या नजरस येऊन पुष्कळ दिवस झाले होते. परंतु या पुढारी म्हणविणाच्या मंडळीच्या कह्यातून त्याच्याच योग्यतेचा पुरुष अद्याप कोणी बाहेर पडला नसल्यामुळे पुष्कळास जरी या चळवळी उतावळीच्या व अविचाराच्या वाटत, तरी त्यासंबंधी सोपपातिक लेख लिहून सदर चळवळींचा अगर त्याच्या पुरस्कत्यांची खरी स्थिति लोकापुढे माडण्यास कोणी तयार झाला नव्हता. विष्णुशास्री हे अशा प्रकारचे पहिलेच टीकाकार होत. यास मार्मिकपणाचा संस्कार पितृपरंपरेनेंच प्राप्त झाला होता. व मराठी आणि संस्कृत ग्रंथाशीं त्यांचा परेिचयही इतरांपेक्षां सहजगत्या अधिक झालेला असून हिदुस्थानच्या व पाश्चिमात्य राष्टांच्या इतिहासाच्या वाचनाने व मननानें राष्ट्राच्या अभ्युदयास कोणत्या प्रकारचे पुढारी लागतात अथवा त्याच्या अंगों कोणते गुण असावे लागतात हे त्यास जास्त चांगलें अवगत झालेलें होतें. इतक गुण असूनही ते कदाचित् पूर्वीच्या पिढीच्या विद्वानांच्या धर्तीवरच गेले असते. परंतु कालमानानें इंग्रजी शिक्षणाचे महत्त्व कमी होत गेलें होतें; व त्यांतल्यात्यात विशेष लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट हो कीं, विष्णुशास्री हे स्वभावत:च अल्पसंतुष्ट असल्यामुळे आपल्या विद्येचा व गुणाचा स्वत:च्या बढतीकडे उपयेोग करून घेण्यापेक्षां लोकास खया ज्ञानाचा व विचारांचा जेणेकरून प्रसार होईल ते काम अधिक महत्त्वाचे आहे असें त्यास वाटत असें. अशा स्थितीत त्यानी आपल्या कर्तव्याची जी दिशा ठरविली व ज्या दिशेनें काम करण्याचा आपला निश्चय तडीस नेण्यास त्यानी शेवटपर्यंत प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांस नावे ठेवणे म्हणजे आपलें गाजरपारखेपण व्यक्त करणे