पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/312

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कै. विष्णुशास्री चिपळूणकर. R৭,৩ होय. एकेश्वरीमताचे किंवा प्रार्थनासमाजाचे पोवाडे शास्त्रीबुवांनीं गाइले नाहीत म्हणून तत्पक्षीय लोक त्यांस नांवें ठेवितात. पण ज्यांनी ह्या संस्था उभारल्या त्यापैकीं एका तरी पुरुषानें या संस्थांचीं मर्त सयुक्तिक असून सर्व पूर्वाचार सोडून लोकानीं तीं घेण्यासारखीं आहेत असें प्रतिपादन करण्यांत आपले सर्वस्व आहे काय ? मग शास्त्रीबुवांनीं त्याचे पोवाडे गाइल नाहींत म्हणून त्यांस दोष देणें म्हणजे * मी जें कहीं भागेच्या तारेंत बोललें तें दुसरा केोणी पंडीत समर्थन करीत नाही ? म्हणून पंडीतवर्गास दूषण देण्याइतकेंच असमंजस नव्हे काय ? आपल्या पूर्वीच्या पिढीतील लोकांनीं आरंभिलेल्या चळवळी निजींव व पोचट आहेत अशी मनाची एकदा खात्री झाल्यावर त्याचे खरें स्वरूप लेोकापुढे माडणे हे देशहितासाठीं झटणाच्या प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य नव्हे काय ? आणि शास्रीबुवानीं तें कर्तव्य केल म्हणून त्यांस का नांवें ठेवावीं हें मला समजत नाहीं. ह्या चळवळीचे खरें स्वरूप लोकांपुढे मांडण्यास ज्या साधनांची जरूरी होती ती सर्व साधनें शास्रीबुवांस उपलब्ध होतीं. पहिली गोष्ट अशी कीं, या चळवळी ज्यानीं उभारल्या होत्या त्यांची नीतिदृष्टया, धर्मदृष्टया किंवा आचारदृष्टया योग्यता किती होती हें त्यास पूर्णपणें माहीत होते. तसेंच दहावीस वर्षाच्या अनुभवानें या चळवळी लोकस कितपत हितकारक होऊं शकतील याचाही त्यास अदमास आलेला होता; व त्यात काय काय दोष आहेत ते ताबडतोब ओळखून लोकापुढ सदर दोषाचे चित्र हुबेहुब वठविण्याइतका मार्मिकपणा व कल्पकताही त्याचे अागात होती. अशा स्थितीत त्यांचे लेख चटकदार व लोकप्रिय झाले यात कांहॉएक नवल नाईों. लोकांस या गोष्टा हव्या होत्या, व तत्कालीन पुढारी मंडळीची कानउघाडणी करणारा पुरुष केव्हां पुढे येतो याची ते अगदी वाट पाहात होते. अशा वेळीं शास्रीबुवांखेरीज दुस-या कोणी हें काम केले असते तर तेही लोकप्रिय झाले असते. पण शास्रीबुवांनीं तें केल्यामुळे त्यांच्य। मार्मिकपणाची त्यात अधिक भर पडून तेच काम अधिक सफाईने तडीस गेले एवढाच काय तेो विशेष होय. विष्णुशास्री याजवर त्याच्या प्रतिपक्षाचा दुसरा असा एक आक्षेप आहे की, सुधारकाचीं सर्व मतें त्याज्य नाहीत अशी त्यांची समजूत असताही त्यांनीं आपली लेखणी सुधारकाविरुद्ध चालवून त्याचा जणू काय विनाकारण सूड घेतला. माझ्या मतें हाही आक्षेप निरर्थक आहे. हिंदुसमाजाच्या आजपर्यंतच्या चालत आलेल्या रचनेंत देशकालामानानें काहीं फेरफार झाले पाहिजेत एवढे कोणीही विचारी मनुष्य कबूल करील. पण हे फेरफार घडवून आणण्याकरिता ज्या व्यक्तींची किंवा उपायाची योजना करावयाची व त्या व्यक्ती किंवा उपाय कोणत्या प्रकारचे पाहिजत याबद्दल मतभेद असणें अगदीं शक्य आहे. शास्रीबुवांच्या पूर्वीच्या पिढीतील लोकाचे असे मत होतें कीं, इंग्रजी शिक्षणानें दहापांच नव्या गोष्टी ३७