पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/283

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६८ लो० टिळकांचे केसरींतील लेख निर्णय लावण्याचा आमच्या बुद्धीप्रमाणे आम्हीं प्रयत्न केलेला आहे; पण याशिवाय जुन्या कागदपत्रांच्या आधारानें कोणास कांहीं म्हणणे असल्यास तें आम्ही मोठ्या आनंदानें प्रसिद्ध करूं, 事 • حه * पचागशाधन गेल्या महिन्या दीड महिन्यांत या विषयाच्यासंबंधानें पुण्याच्या गृहस्थमंडळींत कांहीं चची होण्यास पुन आरंभ झाला आहे ही मोठी समाधानाची गोष्ट होय. पुनः असें म्हणण्याचे कारण असें कीं, कै. प्रो. केरूनाना छले हे हयात असतां त्यानीं या गोष्टींचा पहिल्यानें उपक्रम करून शुद्ध पंचांग छापण्यास सुरवात केली इतकेंच नव्हे, तर तें किंवा तशाप्रकारचे शुद्ध पंचांग प्रचारांत आणण्याबद्दल त्या वेळीं येथील प्रमुख लोकांच्या व ज्येोतिष्यांच्या तीन चार सभाही झालेल्या होत्या. परंतु त्या वेळीं केरोपंतांनीं काढलेली पद्धत नवीनच असल्यामुळे तिजविरुद्ध अनेक आक्षेप किंवा अडचणी दाखविण्यांत आल्या. ग्रहलाघवादि जुन्या ग्रंथांतील ग्रहगतचिीं मानें किंवा वर्षमानें बरोबर आहेत, पण गणित करतांना जोशांच्या कांहीं चुका झाल्या असतील तर मूळ ग्रंथांवरून त्या दुरुस्त करून घेतल्या म्हणजे झाले असे म्हणणारांचा त्या वेळीं एक पक्ष होता. दुसरा पक्ष युरोपियन ग्रंथांतील ग्रहगतींचीं मार्ने किंवा वर्षमान अधिक सूक्ष्म व दृक्प्रत्ययास येणारे आहे हें कबूल करणारांचा होता; पण हीं नवीन मानें धरून ग्रह्लाघवासारखा एखादा नवीन करणग्रंथ झाल्याखेरीज जुने संस्कृत ग्रंथ सोडणें वाजवी नाहीं असा त्याचा आक्षप होता. तिसरा पक्ष अर्थातच नवीन पंचांगाच्या अभिमान्यांचा होय. इंग्लिश किंवा फ्रेंच ग्रंथाच्या आधारें जें सूक्ष्म ग्रह निघतात ते घेऊन त्याप्रमाणें चालण्यास आज सुरुवात करावी, ग्रंथ मागाहून होतील असें यांचे म्हणणें होतें. केरोपंती किंवा पटवर्धनी पंचांग प्रसिद्ध होऊं लागल्यावर आणखी एक पक्ष उपस्थित झाला तो सायनवाद्यांचा होय. कै. लेले, दीक्षित, मोडक हे याचे पुरस्कर्ते होते. यांच्या मतें पंचांगशोधन करावयाचे असल्यास केवळ युरोपांतील ज्योोतेषांनीं सूक्ष्म मानें घेऊनच चालावयाचे नाहीं तर ग्रह्लाघवावरून निरयणरीतीनें पंचांग करण्याची पद्धतही सोडून दिली पाहिजे; किंबहुना सायनपद्धतच शास्रोक्त आहे, निरयण नाहीं असें या पक्षाचे म्हणणे आहे, व त्यांनी सायनपंचांग म्हणून निराळे पंचांग काढण्यास सुरुवातही केलली आहे. पचांगशुद्धीबद्दल महाराष्ट्रांतच अशा प्रकारची चळवळ होऊन राहिली असे नाहीं. गेल्या दोन शतकांत युरोपांतील राष्ट्रांतून ज्योतिषशास्राचे जे शोध झालें त्याची माहिती इंग्रजी ग्रंथद्वारां आमच्या ज्योतेिषांस झाल्यावर पुणे-मुंबईप्रमाणेच काशी { केसरी-तारीख १९ मे १९oo ]