पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/282

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवाजीमहाराजचीि जन्मतिथि. २६७ दिलेली अद्याप उपलब्ध झालेली नाहीं. ** नक्षत्रे च तिथौ विधौ ’ हा ज्या ठीकांत पाठ आहे तो प्राय: जुना असावा. याचे दोन अर्थ होऊं शकतात. पैकीं “ शुद्ध द्वितीया, गुरुवार, रोहिणी ” हाच अर्थ मल्हारराव चिटणीसाचे वेळीं म्हणजे शिवाजीचे उत्तर सुमारें १२५ वर्षानंतर प्रचारांत होता; व पुढे बखरकारांनीं प्राय: तोच अर्थ घेऊन आपआपल्या बखरींत ग्रथित केला असावा. हा अर्थ गणितास जुळत नाहीं इकडे त्यांचे लक्ष न जाणें अगदीं स्वाभाविक आहे. कारण १०० किंवा १५० वर्षापूर्वीचे तिथ्यादि गणित फारच थोड्या लोकांस अवगत असतें, व तितका शोध करण्याचीही लोकाची प्रवृत्ति नसते. सुदैवार्ने आपल्या नजरेस जर ही चूक आज आली आहे तर सर्व पुराव्याचा विचार करून सर्वोस मूळ आधारभूत दस्तऐवज केोणता हें पाहून त्यावरून आपणांस अर्थनिर्णय केला पाहिजे. तसा अर्थ निर्णय करावयास लागले म्हणजे * नक्षत्रे च तिथौ विधौ ?’ याचा दुसरा अर्थ, म्हृणजे तिथि दु॥ १ व नक्षत्न अश्विनी किंवा तीथ पहिली आणि नक्षत्र पहिलें हा सहज लक्षांत येतो. आणि गणित करून पाहिले तर ह्या तिथी, वार व नक्षत्र यांचा सुरेख मेळ बसतो. गणिताचा आणि या अर्थाचा मेळ काकतालीय न्यायानें होत असेल हें म्हणणें बरोबर नाहीं. करितां हल्लीं जो पुरावा उपलब्ध आहे त्या सर्वोचा विचार करता शिवाजीमहाराजांची जन्मतीथ: शके १५४९ प्रभव, वैशाख शुद्ध प्रतिपदा, गुरुवार उत्तर रात्र, अश्विनी नक्षत्र, ता. ६ माहे एप्रेिल सन १६२७. हीच साधार आहे असें मानार्वे लागतें. गणिताचे कसोटीस दुसरी केोणतीही तिथि उतरत नाहीं. ** विधौ ?’ याचा अर्थ निराळा करावा लागतो, पण मग गणित सर्व जुळतें हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. चिटणीसांची व इतर बखरकारांची चूक कशी व कां झाली असावी याचे कारण वर सांगितलेंच आहे. इंग्रजी पद्धतीप्रमाणें वारास मध्यरात्रीं सुरवात होते. करितां गुरुवार उत्तर रात्र म्हणजे इंग्रजी पद्धतीनें शुक्रवार धरून वर इंग्रजी तारीख ६ एप्रिल दिली आहे. सुमारें २७५ वर्षापूर्वी जन्मलेल्या शिवाजीमहाराजांच्या जन्मतिथीबद्दल जुन्या ग्रंथांतून इतका घोंटाळा असावा हें जरा चमत्कारिक तर खरेंच, पण नेपोलियनचा पराभव करणारा प्रसिद्ध इंग्रजी योद्धा व मुत्सद्दी डयूक ऑफू वेलिंग्टन याची जन्मतारीखही अशीच अद्याप अनिश्चित आहे हें लक्षात आणले म्हणजे याबद्दल फारसें आश्चर्य वाटणार नाहीं. कोणीही पुरुष जन्मतेवेळींच तो पुढे मोठा होणार हें समजत नसतें. त्यांतून जिजाबाईसारखी नावडती बायको धामधुमीच्या प्रसंगीं शिवनेरीस प्रसूत झाली. तेव्हां तेथें जन्मलेल्या मुलाची जन्मवेळा कदाचित् काळजीनें तेव्हांचे तेव्हांच कोणीं टिपून ठेविली नसेल. कसेंही असो, जन्मतिथीबद्दल उपलब्ध असलेल्या कागदपत्रांतून पाहतां बराच घोंटाळा आहे. याचा