पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/268

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतवर्षं, २५३ तीनही विषयांचा समावेश केल्याने त्या मासिक पुस्तकाचे मराठ्यांच्या इतिहासास जितकें सहाय्य व्हार्वे तितकें झाले नाही, इतकेंच नव्हे तर एकपक्षी थोडासा अडथळाही झाला असे म्हणण्यास हरकत नाहीं. यापैकीं काव्यसंग्रह कसाबसा का होईना, पण स्वतंत्र रीतीनें निघाला असून तो अद्याप चालू आहे. इतिहास सग्रह अशाच प्रकारे चालू झाला असतां तर बरें झाले असते. वाङ्मयाची त्यांत भर घतल्यानें त्याची लोकप्रियता अधिक वाढेल असे आम्हास वाटत नाहीं; व याचकरिता या दोन्ही गोष्टी एकत्र करूं नयेत अशी प्रकाशकास आमची सूचना आहे. किंबहुना आनंदाश्रमात ज्याप्रमाणें संस्कृतग्रंथ छापून निघतात त्याप्रमाणे वर्षीतून कांही मराठयाच्या इतिहासावरील नियमित जुने ग्रथ व लेख वर्गणीदारांस मिळत असतील तर दरमहा हप्तबदीनें वीसपंचवीस पृष्ठ दिल्यानें जो उपयेोग होतो त्याहून अधिक उपयोग होऊन मराठयाच्या इतिहासाचे पुनरुजीवन करण्याचा जो हेतू तो अधिक सिद्धीस जाईल अशी आमची पूर्ण समजूत आहे. दोन ओझी एकावरच लादण्याचा होईल तितके करून प्रयत्न करूं नये. मराठयाच्या इतिहासाची साधनें अद्याप पुष्कळ प्रसिद्ध व्हावयाची आहेत असें पहिल्या अंकांतील लेखावरूनच उघड होतें; व असें जर आहे तर त्या कामींच या मासिक पुस्तकाचा सर्वाशींच उपयेोग करावा असें आम्हांस वाटतें. असो; आतां यातील काहीं लेखांचा विचार करूं. मराठयाच्या इतिहासाची सामुग्री हा निबंध खरोखरच वाचण्यासारखा आहे. इंग्लिश ग्रंथकारानीं कोणते जुने ग्रंथ मिळविले, ते अगर त्याची भाषातरे उपलब्ध आहेत कीं नाहींत, फारशी भाषेत कोणते ग्रथ मिळू शकतलि, जुन्या सरदाराकडे अगर संस्थानिकांकडे कोणते कागद मिळण्यासारखे आहेत इत्यादि गोष्टींचे या निबंधांत उत्तम विवेचन केलेले आहे; व विशेषतः ग्रॅटडफसाहेबानीं आपणास मिळालेलीं पत्रे जाळलीं असावीत असा जो त्याजवर एक आक्षेप होता तो मुद्देसूद रीतीनें खोडून काढलेला आहे. तथापि परकीयांनीं आमचा इतिहास लिहिण्यांत व आमचा आम्ही लिहिण्यांत खरे काय अंतर आहे याबद्दल जितके विवरण व्हावयास पाहिजे होतें तितकें या निबंधात नाही. आमचे तर असें मत आहे की, आमच्या राष्ट्राचा, लोकांचा, भाषेचा आणि धर्माचा योग्य अभिमान बाळगणारा विद्वान् व मार्मिक इतिहासकार आमच्यांत निपजणे हें मराठयाच्या इतिहासाच्या साहित्यांपैकीं प्रमुख साहित्य आहे, व ते जोपर्यंत आमच्या देशात मिळत नाहीं तोंपर्यंत आमच्या अंत:करणास मोहून टाकणारा आमच्या देशाचा इतिहास आम्हास वाचावयास मिळण्याची कधीही आशा नको. ग्रॅटडफचा इतिहास कितीही नि:पक्षपातबुद्धीनें लिहिलेला असला तरी त्यांत मेकॉलेच्या इग्लंडच्या इतिहासांत जी गोडी आहे ती कोठेच आढळून येत नाही. परंतु यासंबंधानें येथे आज सविस्तर वर्णन करिता येत नाहीं. मराठयाच्या इतिहासाचे निबंधात जे चार भाग केले आहेत ते थोडे बदलून पांच भाग करावे असें