पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/267

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५२ लो० टिळकांचे केसरींतील लेख यटीच्या मदतीनें काढिले आहे; तथापि त्याचे आस्तत्व ब-याच अंशीं लोकाश्रयावर अवलंबून असल्यामुळे त्यास लोकांकडून जर चांगला आश्रय मिळाला नाहीं तर खुद्द काव्येतिहाससंग्रहाची जी अवस्था झाली व त्याच्या पूर्वार्धाची जी होत आहे, तीच त्याच्या ह्या * उत्तर भागा'चीही होईल हें मराठ्यांच्या इतिहासाचा व भाषेचा अभिमान बाळगणाच्या प्रत्येक गृहस्थानें लक्षांत ठेविले पाहिजे. मराठयाच्या इतिहासात महत्त्वाचे केोणते भाग आहेत व त्यापासून आम्हांस केोणता उपयोग होण्यासारखा आहे, हा इतिहास राष्ट्राचा आहे का व्यक्तीचा आहे; मराठथानी जे पराक्रम केले ते धर्मप्रेरणेने केले किंवा स्वातंत्र्य संपादण्याकरिता केले; जे गुण अव्वल मराठेशाहीत महाराष्ट्रांत दिसत होते ते आतां लुप्तप्राय झाले की काय; केोणत्या प्रसगातून कशा युक्तीनें आम्ही आपली सुटका केली; आमच्या राष्ट्राची उन्नति होण्यास कोण कसे कारणीभूत झाले, त्यास काय काय युक्त्या योजाव्या लागल्या आणि ज्यानी या कामी आपल्या देशबांधवाचे हित लक्षात न आणितां अडथळे आणिले त्याचे निवारण कसे करावें लागलें; किंबहुना दीड पावणेदोनशे वर्षेपर्यंत महाराष्ट्रातच नव्हे, तर सर्व हिंदुस्थानभर आमच्या वीरानीं जेो पराक्रम गाजविली त्याचे मूळ बीज व साधनें कोणतीं व पर्यवसान काय झाले याची सकारण, सशास्त्र व मार्मिक माहिती करून घेऊन त्यावरून आमच्या भावी स्थितीसंबंधाने काही अनुमान करितां येण्याजोगें असल्यास ते करावें, निदान या इतिहासावरून जेवढा बोध घेण्यासारखा असेल तेवढा लोकांस करून द्यावा अशी इच्छा अलीकडे पुष्कळास होऊं लागली आहे. हे ज्यानें गेल्या दोन चार वर्षातील महाराष्ट्र देशातील चळवळीचे व इतिहासग्रंथाचे अवलोकन केले असेल त्यास तेव्हाच कळून येईल. मराठयांचा इतिहासाची जी अभिरुचि अव्वल इग्रजीत फक्त इंग्रज लोकातच आढळून येत होती. परंतु अलीकडे कै. विष्णुशास्री चिपळूणकर यानी महाराष्ट्रातील लोकांच्या विचारसरणीस जें वळण लाविले त्यामुळे आपल्या इतिहासाबद्दलची आस्था व अभिमान हीं विशेष जागृत होऊन त्याचीं फलेंही आपल्या नजरेस येऊं लागली आहेत; व यांतीलच भारतवर्ष हें एक फळ होय. या मासिक पुस्तकाच्या चौसष्ट पृष्ठापैकीं चेोवीस पार्ने जुन्या बखरी, ऐतिहासिक पत्रे, यादी यांच्या प्रकाशनार्थ देण्याचा मासिक पुस्तककत्याँचा हेतु आहे. बाकी आठ पाने पत्रव्यवहारांकरितां, व बत्तीस पार्ने वाङ्मयात्मक किंवा ऐतिहासिक स्वतंत्र निबंधाकरिता राखून ठेविली आहेत. पहिल्या दोन अंकांत ‘मराठयाच्या इतिहासाची सामुग्री ’ व * ऋग्वेद ’ हे दोन विषय आलेले चांगले आहेत, तथापि भारतवर्षासारखे पुस्तक होईल तितकें ऐतिहासिक बखरी, जुने कागद किंवा निबंध याच्या प्रकाशनार्थच चालावें असें आमचे मत असल्यामुळे ऋग्वेदासारख्या विषयांवरील निबधाचा संग्रह या पुस्तकांत न झाल्यास त्यापासून पुस्तकाची योग्यता कांहीं कमी होईल असें आम्हांस वाटत नाहीं, काव्येतिहास संग्रहांत, मराठी कविता, संस्कृत काव्यें, आणि महाराष्ट्र इतिहास या