पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/266

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतवर्ष. २५१ गोष्टींची एकवाक्यता करून त्याप्रमाणे चालण्यास तयार असतात असें आम्हांस वाटत नाहीं. भागवत धर्मौत भक्तीचे महत्त्व आहे, उपास्य देवतेचे नाहीं हें: येऽप्यन्यदवताभक्ता यजंते श्रद्धयान्विताः । तेऽपि मामेव कौंतेय यजंत्यविधिपूर्वकम् ॥ या गीतेंतील लोकावरून उघड होतें. सर्व ग्रथ सारखेच ईश्वरप्रणीत आहेत असें जरी भागवतधर्मीत मानले असले तरी खिस्त्यांचा विधि पारशांनीं आणि पारशांचा विधि मुसलमानांनीं उचलावा असा त्याचा अर्थ नाहीं. ज्याच्या त्याच्या धर्मीप्रमाणें ज्यानें त्यानें श्रद्धापूर्वक ईश्वराचे भजन केले असतां त्यास मोक्षप्राप्ति होते. अरेबियन नाईटमधील एका गोष्टींत सागितल्याप्रमाणे भक्तीचा विषय खिस्त असल्यासच स्वर्गाचे दरवाज उघडतील हे खुणेचे शब्द न पटल्यास तें दार उघडणार नाही असें हिंदुधर्माचे तत्त्व नाहीं; व हें तत्त्व खिस्तीधर्मोपासकांच्या मनांत शिरण्यास अद्याप कित्येक शतकें लेाटलीं पाहिजत. खिस्ती धर्मीपेक्षा हिंदुधर्माचे महत्त्व विशेष आहे असें या एकाच गोष्टीवरून सिद्ध होते, मग आमचे खिस्ती भट आपल्या उपास्य देवतेच्या नांवानें कितीही ओरडा करोत. न्यायमूर्ति रावबहादुर रानड यानीं जें हें हिंदुधर्माचे महत्त्व दाखविलें आहे तै खरोखरच सर्वानी व विशेषतः सुशिक्षितानी नेहमीं ध्यानांत ठेवण्यासारखे आहे. या बाबतीत त्याचा आमचा बिलकूल मतभेद नाहीं. मतभदाची स्थळे निराळींच आहेत. व तीही उत्तरोत्तर कमी होत चालली आहेत हें पाहून आम्हास फार समाधान वाटते. न्यायमूर्ति रानडे याची विशाल बुद्धि. प्रार्थनासमाजाच्या पंथांतून भागवतधर्मीत शिरून तेथून उपनिषद् मार्गाकडे वळलैों यावरून पुढे लवकरच ती अद्वैत सिद्धातांत शिरून तेथे स्थिर होईल अशी आम्हास उमेद आहे. [ केसरी, तारीख २७ आक्टोबर १८९६ ] -ബങ്ങ--

  • भारतवर्षे.

भारतवर्ष या नावाच्या नवीन निघालेल्या मासिक पुस्तकाचे दोन अंक आमचेकडे आलेले आहेत, व त्यांत लिहिलेल्या विषयावरून पाहतां माजी काव्येतिहाससंग्रहाप्रमाणें हेंही पुस्तक ‘ मराठ्यांच्या इतिहासाचीं साधनें ? सर्वास प्राप्त करून देण्याच्या फार उपयोगी पडेल असें आमचे मत आहे. पुस्तकाची छपाई व बाह्यस्वरूप चांगले असून त्याची वर्षाची किंमत टपाल हंशिलाखेरीज चार रुपये ठेविली आहे. हें पुस्तक येथे नवीन निघालेल्या डेक्कन व्हनाक्यूलर सोसा ...--ه

  • (केसरी-तारीख ८ डिसेंबर १८९६ )