पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्राह्मण आणि त्यांची विद्या. ই ই ৩ इच्छा असून त्याबद्दल त्याचे प्रयत्नही चालू आहेत. ह्या स्थितींत केवळ नौकरीवर ब्राह्मणाचा निवाह लागेल असे दिसत नाही. कारकुनीच्या धंद्यात ज्याप्रमाणे इतर लोक प्रवेश करीत आहेत त्याचप्रमाणे इतर लोकांच्या धद्यातही ब्राह्मणास थोडाबहुत प्रवेश करावा लागेल. परंतु असा प्रवेश करिते वेळी दोन गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे. एक अशी की, त्यामुळे ब्राह्मण वर सागितलेल्या आपल्या मुख्य कर्तव्यास विसरणार नाहीत, नाहींतर उत्साहवृद्धि करण्याच्या कामांत सर्वच हृमळी बनण्याचा प्रसंग येईल. दुसरी गोष्ट अशी की, ज्या इतर जातीचे धंदे ब्राह्मणांनी करावयाचे ते धंदे त्यानीं अशा रीतीने कले पाहिजे की, त्यामुळे त्या जातीतील लोकाचाही थेोडाबहुत फायदा होईल. असे न झाले तर खोखोच्या डावाची अवस्था होणार आहे. कर्तबगारीच्या व जबाबदारीच्या जागावरून युरोपियनानी ब्राह्मणांस खी दिल म्हणून ब्राह्मणानी वैश्यास व शूद्रास खो देऊन स्वरक्षण करावें हें तत्त्व डार्विनच्या मताप्रमाणें खरे दिसेल, पण सामाजिक नीतिमतेच्या अथवा देशहिताच्या दृष्टीनें असा खोखीचा प्रकार होणें आम्हास इष्ट नाही.इंग्रजी राज्यकत्यांनीं सर्वासच खो दिला आहे, व सर्वांनी मिळून ज्या जागातून खो देऊन आपणांस काढिले आहे त्या जागापैकी थेोडीबहुत जागा तरी आपल्या कह्यात घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इंग्रज राज्यकत्र्याचे असे म्हणणे आहे की, आम्ही तुम्हास खा दिला आहे खरा, पण आम्ही तुमची अधी भाकरी घेतो म्हणून तुम्हास अधीं तरी सुखानें खावयास मिळते. परंतु हे त्याचे म्हणणे केवळ अपमतलबिपणाचे आहे, गोया लोकांनी हिंदुस्थानात पाय ठेविला नसता तर आज आम्ही सर्व रानटी अवस्थेत असतो या म्हणण्यांत जितकें हंसील आहे तितकेच राज्यकत्यांच्या वर दिलेल्या कल्पनेंत आहे. परतु असल्या कल्पनेस पुष्टीकरण मिळण्यासारखाही काही मजकूर प्रि. गोळे यांच्या ग्रंथात एक दोन ठिकाणी आलेला आहे, असों; प्रि, गोळे यानीं आपल्या ग्रंथात प्रासंगिकतेचा विचार न करिता ठिकठिकाणी इतक्या अप्रस्तुत गोष्टी घातल्या आहेत कीं, त्या सवांचे विवेचन करण्यास लागले तर त्याच्या ग्रंथापेक्षा दुप्पट भोठा ग्रंथ लिहावा लागेल. घरच्याघरी बसून जगात चाललेल्या लहान मेोठ्या गोष्टींवर बिनदिक्कत टीका करण्याची व बहुतेक गोष्टीत दोन्हीही पक्षास मूर्ख ठरविण्याची प्रि. गोळे यांची हौस इतकी अनिवार आहे कीं, तिच्या टप्प्यातून बहुतेक कोणताच विषय सुटलेला नाही. जणेोकाय आपणास जी हा ग्रंथ लिहिण्याचा प्रसंग आला आहे यात आपले विचार दाखल न केल्यास ते लुप्तप्राय होऊन जगाची हानि होण्याचा संभव आहे अशी ग्रंथकत्र्याची पुरी समजूत झालेली होती. प्रि. गोळे याचा ग्रंथ अलीकडे भाषातराचे किंवा उष्टया विचाराचे जे काही ग्रंथ होतात त्यापेक्षा अधिक योग्यतेचा आहे, व कांही तरी नवीन गोष्टी सागण्याचा प्रथकत्याचा हेतु असल्यामुळे, व त्याची भाषासरणीही चागली जोरदार असल्यामुळे, एकंदर ग्रथ अपरिपक्व