पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३६ लो० टिळकांचे केसरींतील लेख आम्हीं शिकस्त म्हणजे किती उच उडी मारावी हें त्यानीं ठरवून टाकिले आहे अशा स्थितीतही आम्हास आमचा हुरूप कायम ठेविला पाहिजे. परंतु तो किंडर गार्डन सिस्टिम शाळात सुरूं ठेविल्याने राहील अशी आमची मनेोदेवता आम्हास सागत नाहीं. परंतु आमच्या व प्रि. गोळे यांच्या मतांत जरी या बाबतींत भद आहे तरी त्यानीं ज्या काही शिक्षणक्रमात लहान मोठ्या सुधारणा सुचविल्या आहेत त्यापैकीं बच्याच विचार करण्यासारख्या आहेत हें आम्हीं मोठ्या संतोषानें कबूल करितो. आमच्या मुलावरील शिक्षणाचे ओझें जितकें कमी होईल, त्यास शिक्षण देण्याचे मार्ग जितके सुलभ होतील तितके आम्हास पाहिजे आहेत. पूर्वीच्या राज्यात जे शिक्षण लागत होतें त्यापेक्षां हल्लींच्या राज्यात सामान्यत: तें दसपट अधिक लागत आहे, व वरच्यावरच्या लोकांस ते शतपटही आधक लागतें असे म्हटले तरी चालेल. हें सर्व ओझें जितकें हलकै होईल तितके करण्यास शाळेच्या अधिकाच्यानी व विशेषत: खाजगी शाळांच्या अधिकाच्यांनीं मनापासून झटलें पाहिजे. सरकारच्या दृष्टीनें खाजगी शाळांचा एवढाच उपयेोग आहे कीं, सरकारास जें काम करण्यास पैशाची अडचण आहे ते काम खाजगी शाळा थोड्या खर्चाने करूं शकतात. म्हणज सरकारच्या मनात शाळा जास्त व्हाव्या असें आहे, पण पैसे जास्त द्यावयाचे नाहीत. करितां एका हायस्कूलच्या खर्चात दोन खाजगी शाळा चालल्यास त्यास हव्या आहेत; व त्या होईल तितक्या करून त्याच्या पद्धतीने चालाव्या अशी त्याची इच्छा आहे. या इच्छेस खाजगी शाळाच्या व्यवस्थापकानी कितपत मान द्यावा हाही हल्लींच्या शिक्षणपद्धतीत एक मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे, पण त्याचाही कोठे प्रेि. गोळे यांनी विचार केलेला नाहीं उलट आपल्या विचाराबद्दल आपल्या सेोसायटींतील स्नेही जबाबदार नाहीत अशी त्यानंा आरंभीच इशारत दिली आहे. शिक्षणासंबंधी ज्या काहीं सुधारणा करावयाच्या त्या स्वाथांवर दृष्टी न देतां काढलेल्या शाळांतून जर व्हावयाच्या नाहीत तर व्हावयाच्या तरी कोठे हे आम्हास समजत नाही. शिक्षण जितके सुगम व सुलभ करितां येईल तितकें करणे हेंच खाजगी शाळांचे मुख्य कर्तव्य आहे; व ते जर त्यानीं बजाविलें तर प्रि. गोळे यांच्या ग्रंथातला जो ग्राह्य भाग आहे तेवढा त्यास सहज अमलात आणिता येईल. ब्राह्मणाच्या व्यवसायासंबंधानें प्रि गोळे याचे दुसरे एक मतही आम्हांस ग्राह्य आहे. तें हें की, ब्राह्मणानें आपली दृष्टी इतर धंद्याकडेही आता थोडीथोडी वळविली पाहिजे. राज्यकारभारातील अगर व्यापारातील मोठया फायद्याचा भाग इंग्रजानीं आपल्या हातांतच ठेविला आहे, व तो त्यांच्या मगरमिठींतून सुटल तेव्हा सुटल. तोपर्यंत लोणी युरोपियनास जाऊन खालीं राहिलेल्या ताकांतच आम्हांस आपली तहान भागविली पाहिजे. ब्राह्मणाच्या पूर्वीच्या व्यवसायांपैकीं बराच भाग राज्यकत्यांनी आपल्या ताब्यांत घेतला आहे, व जो अवशिष्ट राहिला आहे त्यांतही इतर लोकानीं ब्राह्मणाचे वाटेकरी व्हावे अशीं इंग्रज लोकाची पूर्ण