पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

& R9 लो० टिळकांचे केसरींतील लेख आम्हांसही मान्य आहे. परंतु ही स्थिति कशामुळे प्राप्त झाली याचे निदान आमच्यामतें निराळे असल्यामुळे प्रि. गोळे यांनीं सुचविलेल्या उपायांत आणि आम्हीं सुचविलेल्या उपायांत भद असणें अगदी स्वाभाविक आहे. हा भद कोणता हें सांगून ब्राह्मण आणि त्यांची विद्या या ग्रंथाचे परीक्षण पुरे करण्याचा आमचा विचार आहे. एकंदर देशातील लोकांचा व त्याबरोबरच ब्राह्मण ज्ञातीचा हुरूप अगर उत्साह नाहींसा होण्याचे आम्हीं दर्शविलेलें कारण जर खरें असेल, तर ही अनिष्ट स्थिति नाहीशी होण्यास काय काय केले पाहिजे हें सहज ध्यानात येण्यासारखे आहे. आमच्या हल्लींच्या शाळांतील शिक्षणक्रम कितीही बदलला तरी, जॉपर्यंत या शाळांतील विद्यार्थी कारकुनाच्या धंद्याकरितांच तयार करितात तोंपर्यंत त्यांचे अंगांत मर्दुमकीचा संचार झालेला कधीही दृष्टोत्पत्तीस यावयाचा नाहीं. विद्याथ्यांचा निरुत्साहीपणाच प्रि. गोळे याच्या विशेष नजरेस येण्याचे हेंच कारण होय. कारकून तयार करणाच्या गिरणीचे मेंनेजरास आपल्या कारखान्यातील मुले अरुंद छातीचीं आढळल्यास त्यांत कांहीं नवल नाहीं. साराश, यावजीव दास्यत्व करण्यापलीकडे कीर्ति व द्रव्य संपादण्याचा अगर उदरपोषण करण्याचा जेंौंपर्यंत दुसरा चांगला मार्गच खुला नाहीं, तोपर्यंत डू या क्रियापदाचा उपयोग असा शिकविला काय आणि तसा शिकविला काय, युनिव्हर्सिटीच्या परीक्षा तीन केल्या काय आणि दोन केल्या काय, त्यापासून इष्ट साध्य होण्यास फारशी कधीही मदत होणार नाहीं. दुधाच्याऐवजीं ताकावर तहान भागविण्याची सर्वास वेळ आली आहे; मग तें ताक उन करून फोडणी देऊन प्या किंवा साधे प्या, अर्थ एकच. यांत कांही सुधारणा होण्यास थेोडेबहुत दूध मिळविण्याचाच प्रयत्न केला पाहिजे, एरव्हीं तरणोपाय नाहीं. धैर्य, उत्साह, साहस आदिकरून गुण ज्या जातीच्या लोकांत होते व अजून थेोड्याबहुत अंशानें दिसत आहेत ते कायम राहण्यास अथवा त्यांचा थोडाबहुत विकास होण्यास सदर गुणांस अनुरूप अशीं कामे करण्याची त्यास संधी मिळाली पाहिजे. * खरें ? यांच्या प्रश्नाचे जें एक उत्तर आज दुसरीकडे छापिलें आहे त्यांत हीच गोष्ट शास्रीय रीत्या दाखविली आहे, व नेटिव लोकांस सिव्हिल सर्विहंसच्या जागा मिळाव्या म्हणून अश्रांत व आजन्म खटपट करणारे मि. दादाभाई नैौरोजी यांचेही असेंच मत आहे. इंग्रज सरकारचे सार्वभौम राज्य जें आज हिंदुस्थानावर अबाधित चालत आहे, तें साहसादि । गुणावांचून चालले आहे असें नाहीं. पण हीं साहसाचीं अगर कर्तबगारीचीं कार्मे करण्याचा मक्ता राज्यकत्यांनी आपल्या हातांत ठेविला आहे. एलफिन्स्टन, मालकम, औटराम, लेक, वेलस्ली वगैरे जुने मुत्सद्दी व योद्धे अथवा सिव्हिल किंवा भिलिटरी सर्विहसमध्यें हल्लीं असलेले किंवा ती सोडून नुकतेच स्वदेशास परत गेलले इंटर, राबर्टस आदिकरून युरोपियन कामगार यांची चरित्रे पाहिलीं तर हाच गोष्ट आपल्या प्रत्ययास येते. महाराज जयाजीराव शिंदे यांनीं