पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२२ ली० टिळकांचे केसरींतील लेख उत्साह वाढण्याचे मार्ग आपणांस आधिकाधिक खुले होतील. आतां असले मार्ग कांहीं आहेत कीं काय असा प्रश्न सहज उत्पन्न होतो. याचे उत्तर देणें बरेंच कठिण आहे; व कदाचित् त्या उत्तरानें गैरसमज होण्याचा संभव आहे; परंतु विषयानुरोधार्ने ते मार्ग दाखविणें हें आमचे कर्तव्य असल्यामुळे आमचे त्याबद्दलचे विचार आम्हास येथे नमूद केल पाहिजेत. या बाबतीत पुष्कळ विचारी पुरुषांचा बराच मतभेद आहे हे आम्ही जाणून आहों. आमचा देश परकीय सतेखालीं जाण्यास किंवा निकृष्टावस्थेस येण्यास काय काय कारणें झालीं याबद्दल जो मतभेद आहे तोच निरनिराळ्या लोकानीं सुचविलेल्या उपायामध्येंही दृष्टेोत्पत्तीस येतो. जातिभेदामुळे हिंदुस्थानचा नाश झाला असे ज्यांचे मत आहे त्याचे मत सर्व जातींचा एक गोलंकार झाल्याखेरीज हिंदुस्थान देश कधीही सुधारावयाचा नाहीं असें आहे. दुसरे कित्येक लोक असें म्हणतात की, हिंदुस्थानातील सर्व लोक जव्हा खिस्ती धमीसारखा एक धर्म पत्करतील तेव्हांच ते वीर्यवान व उत्साह्वान होऊं शकतील. सामाजिक सुधारणावादीही अशाच प्रकारें आपले घोडे पुढे ढकलीत असतात. बालविवाह बंद झाल्याखेरीज लाकांच्या अंगांत उमेद कधीही यावयाची नाहीं; व याकीरतां सामाजिक सुधारणा आधीं केली पाहिजे असें ते प्रतिपादन करीत असतात. हे व असले दुसरे उपाय काहीं चुकीचे तर कांहीं एकपक्षाय आहेत हें आम्हीं मार्गे सांगितलेंच आहे; व प्रि. गोळे यांच्या ग्रंथातही त्यांनी सुचविलेला उपाय खेरीज करून इतरावर अशाच तन्हेचे आक्षेप घेतलेले आहेत. करिता त्याची पुनरुक्ति करण्याची जरूर नाही. आमचे असे मत आहे कीं, ब्राह्मणवर्गास आणि विशेषेकरून दक्षिणेतील ब्राह्मणवगसि जें पूर्वी महत्त्व होतें तें राजकारभारांत अग्रेसरत्व मिळाल्यामुळे होते; व तसें अगर त्याच्याहून थेोडे कमी अग्रेसरत्व जेणेकरून पुन्हा मिळेल अशा उद्योगास आपण लागले पाहिजे. हें अग्रेसरत्व प्राप्त होण्यास समाजस्थितींत किवा गृहस्थितीत ज्या कांहीं सुधारणा कराव्या लागतील त्या अनायासेंच घडून येणार आहेत. त्याजकडे निराळे लक्ष पुरवून त्यांचे देव्हारे माजविण्याचे कांहीं कारण नाहीं. लष्करी पेशाच्या ज्ञातीचे धंदे जाऊन त्यांस कारकुनी पेशांत येणें भाग पडल्यामुळे राजकारणांत अग्रेसरत्व अगदीं पहिल्याप्रमाणें ब्राह्मणांस आतां मिळावयाचे नाहीं हैं खरें आहे; तथापि एकंदर हिंदुसमाजाचा विचार करितां ब्राह्मणवर्गानें राजकारणी खटपट सोडून स्वतः सुताराचे, लोहाराचे किंवा वैश्याचे धेदे केल्यापासून देशाचा अधिक फायदा होईल असें आम्हांस वाटत नाहीं. हिंदुसमाजाची रचना यूरोपातील समाजरचनेहून अगदीं भिन्न आहे. हें प्रत्येक देशहितचिंतकार्ने लक्षात ठेविले पाहिजे. ज्याप्रमाणें ब्राह्मणास आपली स्थिति सुधारावी असे वाटतें त्याचप्रमाणे देशांतील प्रत्येक ज्ञातीस आपापली स्थिति सुधारत जावी असे वाटणें अगदीं स्वाभाविक आहे; व ब्राह्मणज्ञातींतील लोक जर सर्व धंद्यांतील अग्रेसरत्व आपणाकडेच घेण्याचा प्रयत्न करतील तर त्यांचा व इतर ज्ञातींचा सहज विरोध उत्पन्न होईल.