पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्राह्मण आणि त्यांची विद्या. २२१ काय करावयाचे हा एक मोठाच प्रश्न उपस्थित होतो. हल्लीं आहे हीच स्थिति जर कायम राहिली तर कांहीं वर्षानीं हिदुस्थान म्हणजे सर्वोशीं इंग्रजांवर अवलंबून राहणारा एक देश आहे असें होईल; आणि त्यामुळे अखेरीस आमच्या राज्यकत्र्यासही आपल्या राज्यव्यवस्थेचे प्रायश्चित मेोगण्याचा प्रसंग येईल असें दिसतें. तीस कोटी प्रजेस हतवीर्य आणि निरुत्साह करून त्याच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्याइतकी धमक इंग्रज राज्यकत्यांच्या अंगांत आज आहे खरी; पण ही धमक सदोदित कायम राहते असें नाहीं; व ती धमक कायम राहिली नाहीं तर अखेरीस तीस कोटी मेढरें निराश्रित उघडीं पडण्याचा अथवा दुस-या कोणत्या तरी एखाद्या लांडग्याच्या तडाख्यात सापडण्याचा प्रसंग यावयाचा. करितां शहाण्या राज्यकत्र्यानीं वेळींच सावध राहून प्रजेस अगदी सत्त्वहीन, बलहोन व द्रव्यहीन करता कामा नये. अशानें कदाचित् पुढेमार्गे राज्यास धेोंका येईल अशी कित्येकांची शंका आहे; पण दूरवर विचार केला असतां असे आढळून येईल कीं, ज्या प्रजेवर राज्य करून आपण कित्येक वर्षे चैन चालविली तीस पुढे मागे दुस-यास बळी देण्यापेक्षा चांगले शिक्षण देऊन ती स्वतंत्र झालेली पाहणें कांहीं वाईट नाहीं. असो; हा विचार फार दूरचा आहे. शिवाय राज्यकत्र्यानें काय केलें पाहिजे याचा आपणास तूर्त विचार करावयाचा नाहीं. आपण काय केले पाहिजे अथवा आपल्या हातांत कोणते उपाय आहेत हें पहावयाचे आहे. करितां त्या विषयाकडे वळू, आमची अशी समजूत आहे की, हिदुस्थानास सध्या जी स्थिति प्राप्त झाली आहे ती आपल्या हातून होईल तितकी सुधारण्याची खटपट करणें हेंच ब्राह्मणज्ञातीचे पहिले मुख्य कर्तव्यकर्म आहे. प्रि. गोळे यानीं राजकारणात पडलल्या ब्राह्मणाच्या खटपटीचा काहीं ठिकाणीं बराच उपहास केलेला आहे, व दुस-या ठिकाणीं ब्राह्मणांनी नोकरी न धरिता स्वतंत्र राहून बंधूमीतीचे, लोकानुकंपेचे व परहितार्थ खटपट करण्याचे उदाहरण घालून द्यावें असेंही सागितलें आहे. परंतु असला विरोध ज्या अर्थी ग्रंथांत दुसच्याही बाबतींत आढळतो, त्याअर्थी त्याची येथे विशेष चर्चा करण्याचे काहीं कारण नाहीं. खोलींत बसून ज्याची त्याची थट्टा करावयाची हाच जेथे ग्रंथकाराचा मुख्य हेतु असतो तेथें त्याच्या लेखांत विरोध व विसंगतताही असावयाचीच. प्रि, गोळे यानीं ठरविलेले ब्राह्मणांच्या निकृष्ट स्थितीचे निदान जितकें चुकीचे आहे तितकेंच त्यांनीं सुचविलेले उपायही अयोग्य आहेत. यासाठी त्याच्या दिशेनें न जाता निराळ्या बाजूनेंच या प्रश्नाचा निकाल केला पाहिजे. उत्साह, शौर्य, किंवा कर्तबगारी दाखविण्याची हल्लींच्या राज्यांत सवड न राहिल्यामुळे जर आम्ही नि:सत्व झाली असली तर तशी सवड जेणेंकरून मिळेल असलेच उपाय प्रथमत: आपणांस योजिले पाहिजेत हें उघड आहे. जसा रोग तसें औषध, या न्यायार्ने आम्ही आतां जो उपदेश करणार तो असा पाहिजे कीं, त्यामुळे आमच्या अंगचा