पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* く लो० टिळकांचे केसरींतील लेख ब्राह्मणांस ज्या जागा मेिळत नव्हत्या त्या मराठयांस देण्यास सरकार तयार आहे. नेटिवांस कोणत्या जागा द्यावयाच्या त्याचा नियम निराळ्याच घोरणावर बांधला आहे. व तें धोरण सर्व नेटिवांस म्हणजे ब्राह्मण, मराठे, मुसलमान, पाशीं, शीख वगैरे लोकांस एकसारखेच लागू आहे. सारांश, मराठा कितीही तरतरीत असला तरी हल्लींच्या काळीं महादजी शिद्याची त्यास योग्यता यावयाची नाहीं, तें खातेंच त्यास बंद आहे. आता ब्राह्मणांस कांहीं खालच्या प्रतीच्या जागा ठेविलेल्या आहेत त्यात पाहिजे तर त्यानें आपला समावश करून घ्यावा. मराठे लोकांची सुधारणा सुधारणा म्हणून जो कांहीं हल्लीं उद्योग चालला आहे तो याचकरिता होय. महाराष्ट्रातील ब्राह्मण व मराठे हे दोघेही आपापल्या विशिष्ट कर्तृत्वानें इंग्रजी राज्य होण्यापूर्वी उदयास आलेले होते. पैकीं इंग्रजी राज्यात ब्राह्मणांच्या कर्तृत्वास फारच थोडा अवकाश राहिलेला आहे व मराठयांचा विशिष्ट व्यवसाय बुडून त्यांस ब्राह्मणाबरोबर कारकुनी पेशाच्या धंद्यात शिरण्यास उत्तेजन मिळत आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम पुढे कसा होणार तें नीट लक्षात आणिले पाहिजे. कोणाचेच कर्तृत्व इंग्रज सरकारास नको आहे. हिंदु लोकांस किती वाढू द्यावयाचे त्याची यत्ता त्यानीं ठरवून टाकिली आहे. जी झाडे या यतेपेक्षा जास्त वाढतील तीं तोडून टाकावयाचीं; व जीं या यतेपेक्षा कमी असतील त्याबद्दल मोठी उदार बुद्धि आणि कळकळ दाखवून ** ओरेरे तुम्ही मार्गे पडलांत काय, तुम्हास आम्ही ब्राह्मणांच्याबरोबर आणून ठेवितों.” असें वरपागीं नि:पक्षपातबुद्धीनें उत्तेजन द्यावयाचे हा क्रम सुरूं आहे. असल्या राजनीतीने कित्येक ज्ञाती सुधारत आहेत, व कित्येक खाली जात आहेत असें सकृद्दर्शनी दिसून येतें; पण ही दृष्टीची भूल आहे. वास्तविक पाहता हिंदुस्थानातील सर्वच जातीस नियमित मर्यादेपेक्षां वाढू न देण्याचा हल्लींच्या राज्यपद्धतीचा रॉख आहे; व जर त्यामुळे एकाद्या जातीस उत्तेजन मिळत असलें तर वर सांगितलेल्या नियमित मर्यादेपर्यंत सरकार जातीभेद ठेवू इच्छित नाहीं येवढेच त्याचे खरें कारण आहे. जुलमी अवरंगजेबाच्या राज्यातही जयसिंगसारख्या रजपूत सरदारास स्वतंत्र रीतीनें पराक्रम करून दाखविण्यास सवड होती; पण तशा प्रकारचा आतां एकादा पुरुष असल्यास त्यानें सुभेदार मेजर व्हावें किंवा कायद्याची बुकें घोकून मामलेदार मुन्सफ व्हावे, याखेरीज दुसरा मार्ग नाहीं अशी स्थिति आली आहे. या कचाट्यातून आम्ही कसें सुटणार याचा नीट विचार करून आमच्या पुढायांनीं आमल्या भावी उन्नतीची दिशा आम्हांस ठरवून दिली पाहिजे. बालविवाहादि सामाजिक व्यवस्थेच्या दोषांमुळे आम्ही एकंदर इंग्रज लोकपेक्षां सामान्यतः कमी ताकतवान असू. पण आयलैंडसारख्या देशाकडे दृष्टी दिली म्हणजे केवळ असल्या सामाजिक चालींमुळेच आमचा उत्साह शून्य झाली आहे हें म्हणणे बरोबर वाटत नाहीं. शिक्षणक्रमाबद्दल प्रि. गोळे यांचे म्हणणेंही अशाच प्रकारचे आहे. या क्रमांत दोष नाहीत असें आमचे म्हणणें नाहीं. उलट ते दोष काढून टाकण्याचा