पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९८ लो ० टिळकांचे केसरींतील लेख

  • आमच्या बुद्धीस खरोखर उतरती कळा लागली आहे काय ?

दोन तीन वर्षांपूर्वी डॉ. भांडारकर व न्या. रानडे यांनी आपले तरुण सुशिक्षित लोक अल्पायुषी होतात असें साधकबाधकप्रमाणे दाखवून सिद्ध केलें; व आम्हास एक प्रकारची काळजी उत्पन्न केली. तिच्याच तोडीची काळजी प्रेो. गोखले यानी नुकतीच उत्पन्न केली आहे. ‘हल्लींचा शिक्षणक्रम' या विषयावर नुकताच त्यानी मुंबई येथील ग्रॅज्युएट असेोसियेशन पुढे एक चागला निबंध वाचला; त्यात त्यांनी अनेक विषयाचे प्रतिपादन केले आहे. त्या सर्व मुद्याचा आज आम्ही येथे उल्लेख करीत नाहीं, कारण ते मुद्दे नवीन नसून जुनेच आहेत. परंतु त्यापैकी एकाचा येथे उल्लेख केला पाहिजे. ते म्हणतात माझा अनुभव असा आहे कीं, हल्लीचे जे विद्यार्थी कॉलेजात येतात त्याच्या बुद्धीचा हळूहळू व्हास होत आहे. पूर्वीच्या विद्याथ्र्यासारखी त्याची बुद्धि तर तरीत नाहीं ही गोष्ट अगदीं निर्विवाद असून उधड उघड दृष्टीस पडण्यासारखी आहे. प्रो. गोखले याचा नेहमी कॉलेजातील विद्याथ्यांशीं निकट संबंध असती तेव्हां त्यांनी मननपूर्वक एखादें विधान केले, मग तें आपणास प्रिय असो वा अप्रेिय असेा, त्यांच्या म्हणण्यास सर्वोनीं मान देऊन त्याचा विचार करावयास लागावें हें आपणांस उचित होय. मि. गॅोखले हे आपल्या निबंधात आपल्या एकट्याच्याच अभिप्रायावर भिस्त ठेवीत नाहींत. त्यांनी आपल्या म्हणण्याचे पुष्टीकरणार्थ येथील नामाकित प्रि. सेल्बीसाहेब हे या विषयासंबधाने काय म्हणतात हें नमूद केले आहे. मि सेल्बी याचा अभिप्राय आमच्या प्रोफेसरासारखाच आहे; परंतु पाच वर्षांपूर्वी डॉ. मॅकेकन यांनी याच मुद्यासंबंधाने आपल्या भाषणांत जो उल्लेख केला होता तो पाहाता त्यास प्रो. सेब्बी व गोखले यांसारखें वाटत नाहीं. उलटै त्यास असे वाटते की, हल्लीचा उत्तम विद्यार्थी व पूर्वीचा उत्तम विद्यार्थी या दोघाची तुलना केली असता हल्लीच्या विद्याथ्यांचे पारडें वर जाईल अशी भीतीच बाळगावयास नको. मुंबईचे गॅझिटकर्ते ह्यानीं मि. गोखले यांच्या निबंधावर टीका करितांना प्रस्तुत मुद्याविषयीं असे म्हटलें आहे की, हा मुद्दा वादग्रस्त असून त्याजविषयीं एखाद मत बनविण्याची वेळ अद्याप आली नाहीं. टाईम्स ऑफ इंडिया कत्यांनीही त्याजविषयीं आपले मत दिलें नाहीं. फक्त त्या मुद्याचे दिग्दर्शन मात्र केले आहे. अशा वादग्रस्त विषयाविषयीं एखादा अभिप्राय प्रकट केला तर हें एक प्रकारचे साहस आहे असे म्हणणार पुष्कळ लोक निघतील. परंतु मससै गोखले व सेल्बी हे कोण आहेत, हे काय करितात ह्याचे मनन केले म्हणजे मि.

  • ( केसरी-तारीख २१एपिल१८९६. )