पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशिवदिग्विजय-स्फुट १९७

  • श्रीशिवदिग्विजय-स्फुट

श्रीशिवदिग्विजय या बखरीच्या जुनेपणावर आम्हीं जे आक्षप काढले होते त्याबद्दल कित्येक पत्रातून बरीच चर्चा झालेली आहे; पण दु:खाची गोष्ट येवढीच कीं, आम्हास उत्तर देण्याचा म्हणून ज्यांनी प्रयत्न केला आहे त्यास असल्या ऐतिहासिक गोष्टीची कशी व किती बारीक चवकशी करावी लागते याचा गंधही असलेला आढळण्यांत येत नाहीं, बखर ज्यानी लिहिली असे प्रकाशकाचे म्हणणे आहे त्याबद्दलचा पुरावा प्रकाशकांच्या दप्तरातून बाहेर निघत नाहीं, इतकेच नव्हे तर आम्हीं केलल्या आक्षपाबद्दल मुद्दाम गैरसमज करण्याचा प्रयत्न चालू आहे. एकाने तर केसरीत दिलेल्या एका शकात आकड्याची जी चूक झाली आहे ती दाखवून त्यावर बरेच पाडित्य केले आहे. पण त्यास असे कळेना कीं, केसरांत जर एका आकडयाचा दुसरा आकडा होऊं शकतो तर बखरीत तसा प्रकार होण्यास काय अडचण आहे ? आमची वाद वाढविण्याची इच्छा नाहीं. ज्यास इतिहासाचे सूक्ष्म अवलोकन करावें लागते हे समजत नाही त्यास आम्हीं कितीही सागितले तरी पालथ्या घडयावर पाणीच; व ज्यास ह्या गोष्टी समजतात त्याची आम्ही लिहिलेल्या लेखावरून ही बखर जुनी नाही-निदान ती जुनी आहे असे मानण्यास पुढे आला आहे तेवढा पुरावा बस्स नाही-अशी खात्री होईल. आमचा आक्षेप एवढाच आहे कीं, १६४० व १७४० असे दोन्ही शक जर बखरीतच आढळतात तर त्यापैकीं एक कोणता तरी चूक असलाच पाहिजे. कोणता चुकला याचा निर्णय करण्याचे साधन बखरीतच आहे ते असें की, जेथ जेथे हे शक दिले आहेत तेथे तेथे त्या शकाची व त्याच वर्षी असलेल्या विक्रम संवत्सराची नावे दिली आहेत. ही नावें बहुधान्य व विरोधी ही होत. ही देोन्हीही नावे अनेक वेळा बखरीत आलेली आहेत, व हे दोन्हीही संवत्सर शके १७४० सालीं येतात; शके १६४० येत नाहीत.यावर एकाचे म्हणणे आहे कीं, आकडयावरून गणित करताना हे चुकले असतील; परंतु ही शंका फुकट आहे. कारण ज्या सालात बखर लिहिली त्या सालचा संवत्सर गणिताने काढावयास नको, तो त्यावाचून माहित असतो. तसेंच बहुधान्य हा संवत्सर शके १६८० साली येतो ही गोष्ट खरी आहे; पण शके १६४० व १७४० या दोहोपैकी कोणता खरा याचा जर निर्णय करावयाचा आहे तर त्यात १६८० चा सग्रह होऊं शकत नाहीं. सारांश, शके १६४० हा आकडा खरा मानल्यास १७४० चुकले असे म्हणावे लागतें, इतकेच नव्हे, तर बहुधान्य व विरोधी ही नावेंही सर्व ठिकाणी चुकीनेच लिहिली गेली असे म्हणावें लागेल. यापैकी अधिक संभवनीय गोष्ट कोणती याचा निकाल कोणासही समजण्यासारखा आहे. nagsasastransmisszattao [ केसरी-ता. ३१ मार्च १८९६ }