पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९२ लो० टिळकांचे केसरींतील लेख विद्यापीठांचे आमच्या देशांतील युनिव्हर्सिट्या हें अनुकरण होय. आमची पूर्वीचीं विद्यामंदिरे किवा गुरूंचे आश्रम याचा हळू हळू -हास होऊन ते आतां नामशेष झाले आहेत; व त्याचेएवजीं ज्या संस्था अस्तित्वात आल्या आहेत त्या जशा असाव्या तशा नसल्यामुळे कोणत्याही शास्त्राचा अथवा विद्येचा शोधक बुद्धीनें आस्थापूर्वक अभ्यास करणारे गृहस्थ आमच्या देशात अलीकड पैदा होत नाहीत. नवीन शोध करण्याइतकी बुद्धि अथवा योग्यता आमच्या अॅगात नाहीं असे नाही ज्या देशात पाणिनी, कणाद, शंकराचार्य, भास्कराचार्य वगैरे विद्वान् पूर्वकालीं होऊन गेले त्यात सध्याचे काळीं पास्चूर, एडिसन, स्पेन्सर, मिल्ल वगैरे गृहस्थाप्रमाणे विद्वान् का निपजूं नयेत याचे खरे कारण शेोधून काढून त्याचा प्रतिकार करणे हे प्रत्येक विद्यावृद्धि इच्छिणाराचे कर्तव्य आहे. ब्राह्मण व त्याची विद्या या पुस्तकाच्या कत्याने या विषयाचा किंचित् विचार केलेला आहे. पण सदर कत्र्याच्या एककल्ली विचाराचा त्यात ठिकठिकाणी बराच प्रादुर्भव झाला असल्यामुळे या पुस्तकाचे पर्यवसान भलत्याच रीतीचे झालेले आहे. ज्या ब्राह्मणाच्या संस्था बुडून जाऊन त्या ऐवजी युनिव्हर्सिट्या स्थापन झाल्या त्याची योग्यता युनिव्हासँटयास न आल्यास त्याचा दोष ब्राह्मणापेक्षा युनिव्हर्सिटी स्थापन करणा-या किंवा चालविणाच्या गृहस्थाकडे विशेष रीतीनें येऊ पाहती व वास्तविक रीतीने म्हटले म्हणजे या प्रश्नाचा खल सदर नूतन विद्यामदिराच्या अधिपतीनीं अथवा त्याच्या दुय्यमानी केला पाहिजे. डॉ. भाडारकर याच्या व्हाईस-चान्सेलरच्या कारकीर्दीत त्यानी जें भाषण केले त्यात या विपयाचा उल्लेख केलेला होता; परंतु डॅ.ि साहेबाच्या काही आवडत्या कल्पना लोकापुढे माडणें त्यास जरूर वाटल्यावरून सदर कल्पनानीच त्याच्या भाषणाचा बराच भाग अडविला होता. यंदाचे साली डॉ. भाडारकर याचे जागीं हायकोर्टाचे जऽज मि. जार्डिन याची नेमणूक झालेली आहे; व विद्वतेसंबंधानें त्याचा जो लौकिक आहे त्यावरून त्याचे भाषण व्यापक, मुद्देसूद आणि कळकळीचे हेोईल असे सवीस वाटत होतें. परंतु त्याचे गेल्या आठवड्यात पदवीदानसमारंभाचे वेळी जै। भाषण झालें तें या कसेोटीस लावून पहाता बरेंच कमी पडते. कदाचित् ह्या नव्या व्हाईस चान्सेलरास आपले भाषण तयार करण्यास पाहिजे तेवढा वेळ मिळाला नसेल. वास्तविक म्हटल म्हणजे लेॉर्ड सेंडहस्र्ट हेच या समारभाचे वेळीं अध्यक्ष व्हावयाचे; कारण हें त्याचे पहिलेंच वर्ष होतें. पण तसा योग न येतां जार्डिनसाहेबासच तो समारंभ साजरा करावा लागला. कर्सेही असो, या नव्या व्हाईस-चान्सेलरांनी आपल्या भाषणात ज्या दोन चार गोष्टी सागितल्या आहेत त्या सर्वानीं विचार करण्यासारख्या आहेत. याचे असे म्हणणे आहे की, हिंदु लेोकास विद्येची अभिरुचि किंवा शोधक बुद्धीने शास्त्राभ्यास करण्याची योग्यता नाहीं असें नाही. पण हल्ली विश्वविद्यालयात जी व्यवस्था आहे व ज्या पद्धतीनें त्याचे काम चालत आहे, त्यामुळे पास्चूरसारखे विद्वान् येथे निघत नाहीत. कोणत्याही सुधारलेल्या देशांत