पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामाजिक सुधारणेचे मार्ग १९३ युनिव्हर्सिट्यांची व्यवस्था शाळा व कॉलेजें यांतील गुरूपगुरूंकडे असते; ती व तशी असणें अगदीं स्वाभाविक आहे. आपलें आयुष्य, अध्ययन व अध्यापन यांत घालवितात त्यांसच विद्याथ्यांचे खरे गुणदोष अथवा अडचणी समजून येणे शक्य असतें. युरोपांतील प्रसिद्ध युनिव्हर्सिटींतून तेथील व्यवस्थेचे काम अशा प्रकारच्या विद्वानांकडेच असतें. परंतु आमच्याकडील प्रकार त्याहून अगदीं भिन्न आहे. आमच्या युनिव्हर्सिटींत विद्याभ्यासाकरितां एकही जागा ठेवलेली नाहीं. त्यामुळे युनिव्हर्सिटी ही एक परीक्षेचा शिक्काच देण्याचे यंत्र बनून गेले आहे. बरें, युनिव्हर्सिटींत उत्तम विद्वानाची सोय नाहीं तर नाहीं पण कॉलेजांतून तरी ती पाहिजे कीं नाही ? परंतु तेथे तिचा अभावच नजरेस पडतो. नेटिवास प्रेोफेसरची जागा मिळणे अशक्यच, व विलायतेहून इकड जे प्रोफेसर येतात ते तिकडील तिसया चवथ्या प्रतीचे ग्रॅज्युएट कोणाच्या तरी वशिल्यानें येत असल्यामुळे आमची विद्यापीठे म्हणजे विद्येचे पिठे झाले आहेत. संस्थातून उदरनिर्वाहाची काळजी न बाळगतां रात्रंदिवस विद्याभ्यासात निमग्न झालेली मंडळी आढळून यावयाची त्यात विलायतेंतून इकडे पैसे मिळविण्याकरितां आलेले गुरु आणि परीक्षेकरितां बुके घोकणारे त्याचे छात्रवर्ग यांचा गलबला मात्र ऐकू येतो. असल्या विद्यालयापासून विद्येची, छात्रवर्गाची अथवा देशाची उन्नति कशी होणार; गुरूपगुरूच्या विद्याभ्यासाचा आणि सद्वर्तनाचा परिणाम शिष्याच्या मनावर होण्यास गुरुजी खरोखर विद्याव्यसनी असून छात्रवासी वर्गाशीं प्रेमभावानें वागणारे असले पाहिजेत. दोहोंच्याही नांवानें आमच्याकडे पूज्यच. तेव्हां परीक्षेत पहिला नंबर येऊन पुढे आपल्या बुद्धिमतेचा कायदे शिकून द्रव्यार्जन करण्यांत उपयेोग करणारे विद्यार्थी आमच्यांत निघाल्यास त्यात नवल कोणतें ? मुंबई युनिव्हर्सिटी १८५७ सालांत स्थापन झाली, पण तेव्हांपासून आतांपर्यंत सुमारें चाळीस वर्षीत या संस्थेतून एकही जगप्रसिद्ध विद्वान् निघू नये हें आश्चर्य नव्हे काय ? तेलंग, रानडे, भांडारकर वगैरे कांहीं विद्वान् यापूर्वी युनिव्हर्सिटींतून निघालेले आहेत, पण त्यांपैकी इतर धंद्यांत शिरल्यामुळे त्याच्या बुद्धिमतेचा व विद्वतेचा शास्राभ्यासाच्या कामीं जसा उपयोग व्हावा तसा झालेला नाहीं. आतां यामुळे इकडे शास्राभ्यासांत जी हानी झाली ती दुसरीकडे म्हणजे कायद्याचे अभ्यासांत भरून आली असे जार्डिनचे म्हणणे आहे व तें एक अंशीं खरे आहे. पण त्याचा उपयोग काय ? ज्यानें समरांगणी अश्वारूढ होऊन दोन हात करावयाचे त्यार्ने आपलें कौशल्य घरांत बायकेच्या नथेतून तीर मारण्यात जर खर्च केलें तर त्यास ज्याप्रमाणे आपण नांवें ठेवू त्याचप्रमाणेच प्रस्तुतचा प्रकार आहे. आमच्या युनिव्हर्सिटीत आधीं खरे विद्याव्यासंगी गुरु व उपगुरु नाहीत; त्यातूनही सदर युनिव्हर्सिटीची व्यवस्था अगदीं ति-हाइताच्या म्हणजे कॉलेजातील गुरूपगुरू ९४