पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुनर्विवाह, & ৪৩ झालीं हें इतिहासज्ञांस माहीत आहेच; तीं त्याच्यात आमरण दारिद्रय व ब्रह्मचर्य ह्याविषयीं कडक निर्बध होते म्हणूनच झाली ह्यात काही संशय नाहीं. आमच्या इकडेही असे पराक्रम केल्याची थोडींथोडकी उदाहरणे आहेत असे नाही. श्रीमत् शंकराचार्यानीं ३२ व्या वर्षाच्या आंत सकल विद्या संपादन करून व अनेक ग्रंथ लिहून धर्म संस्थापना केली; बौद्धप्रेषितानी अध्यी अधिक आशिया खंडावर आपला धर्म फैलावला; फार कशाला, अगदी अलीकड दयानंदजीनी आपल्या आर्यसमाजाचा प्रसार केला; ही सर्व कशाची फळे ? आर्य समाजाप्रमाणे प्रार्थना किंवा ब्रह्मोपंथाचाही प्रसार का होत नाही ? बगाल्यातील व्रहा धर्मीचा विचका होण्याचे मूळ कारण बाबू केशवचद्रानी कुचबिहारच्या सपत्तीस भुलून आपल्या मुलीचा बालविवाह केला हे होय. बाबू केशवानीं मुलीचे लग्न केले नसतें तर तो परिणाम टळला असता की नाही ? तसेच राजकीय बाबतीत सरकाराविरुद्ध ब्र काढण्याची पुष्कळाची छाती होत नाही ती तुरुगाची किंवा स्वार्थहानीची भीति वाटते म्हणूनच नव्हे काय ? तेव्हा अशा कामाला पाशरहित पुरुषांची आम्हांला किती जरूर आहे बरें ? डोक्यावर कुटुबपोषणाचा बोजा असलेल्या मनुष्यास * बाबारे सरकारी रुपेरी बेडी कशाला पत्करतोस ? कसे तरी पेोट भरून बाजारच्या भाकरी भाज.' असा उपदेश करणे म्हणजे आपली परदुःखशीतलता व्यक्त करणे होय. अशा कामाला सडेफटिग लेाकच पाहिजेत. ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यास आमच्या म्हणण्याची सत्यता सवांच्या लक्षात येईल. पण देशाचे अनेक फायदे होतील एवढयाकरितां अविवाहित राहावयाचे असें नाहीं. तर तसे करणे थोड्याबहुत अंशाने प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मनुध्याची ऐहिक कर्तव्यकर्मे तीन प्रकारची असतात; स्वत:संबधाची, कुटुबासंबंधाचीं व आपण ज्या समाजात राहात त्या समाजासबंधाची. त्यापैकीं पहिल्या दोहोंसबधानें काहीं लिहिण्याची जरूर नाही; कारण तीं करण्याकडे मनुष्यमात्राची स्वाभाविकच प्रवृत्ति होत असते; परतु तिस-या सबधाने मात्र वरचवर त्याला जार्गे करावे लागतें लोकाच्या हिताकरिता ज झटावयाचे ते परोपकार म्हणून नव्हे किंवा लोकानीं तसेच आपल्या उपयोगी पडावे अशाच स्वार्थ बुद्धीनेही नाही; तर समाजात राहिल्यापासून प्रतिक्षणी साक्षात् किंवा परंपरेने आपणास जे असंख्य फायद होतात त्याच्या प्रत्युपकारार्थ समाजाच्या हिताकरिता झटणे आपले प्रत्येकाचें कर्तव्यच आहे मला लोकाची जरूर नाही असे म्हणणाराचे कधीही चालावयाचे नाहीं. समजून उमजून किंवा न समजता, आपले शत्रु, मित्र किंबहुना एकंदर लोकसामज, आपल्या सुखदुःखवृद्धीला कारण होत असतो. उदाहरणार्थ, रुपयाभरांत शंभर मैल चैनीने प्रवास करता येणे, देन पैशांत दूरची बातमी समजणे वगैरे एकट्याला अशक्य असणाच्या गोष्टी संघशक्ती