पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रावबहादुर रानडे यांचे अपूर्व युक्तिचापल्य ६१

उन्मत्तं पतितं क्लीबमबीजं पापरोगिणं
न त्यागो स्ति द्विषत्याश्च न च दायापवर्तनं |

मनूनें सांगितले आहे. पापरोग म्हणजे कुष्टादि महारोग असा कुल्लूकांनी अर्थ केला आहे. या चार कारणांखेरीज जर स्त्री पुरूषाचा त्याग करील तर तें साह्स समजून राजाने तीस दंड करावा असें सर्व स्मृतींत सागितलें आहे.

आतां रा.ब.ची "जुक्ति" पहा कशी आहे ती. रा.ब. म्हणतात कीं जर स्त्री पुरूष द्वेषिणी असेल म्हणजे तिचें नव-याशीं बनत नसेल व म्हणून "त्याचे घरी न नादता ती पित्याच्या घरी निर्दोष राहील" तर तिच्यासंबंधाने पुरूषास दुसरा विवाह करण्याची मोकळीक आहे; व जर असा अधिवेदनाबद्दल पुरूषास दंड नाहीं तर स्त्रीस तो कसा संभवतो ! वा ! खाशी तोड ! व खासे अनुमान ! "पुरूषद्वेषिणी स्त्री पित्याकडे राहिली तर" असे जे शब्द रा.ब.नीं वापरले आहेत ते त्यास कोठें सांपडले ? आपल्या पदरचेच शब्द ढकलून देऊन त्यावर अनुमान बाधण्याची रा.ब.ची ही खूप अपूर्व हातोटी आहे ! मागे जीं वचनें दिलीं आहेत त्यावरून वाचकाचे लक्षात आलेंच असेल कीं, पुरूषानें जरी दुसरें लग्न केले तरी त्यास कारणावाचून पहिली बायको सोडता येत नाहीं. सोडल्यास दंड आहे. आणि तसेंच पुरूषाने पूर्वोक्त कारणाकरिता जरी दुसरें लग्न केलें तरी पहिल्या बायकोने त्याचे जवळच राहिले पाहिजे. त्यास सोडून रा.ब.नीं सागितल्याप्रमाणें पित्याच्या घरी तीस जाता येत नाही. मनूंत सागितले आहे:--

अधिविन्ना तु या नारी निर्गच्छेद्रुषिता गृहात्
सा सद्य: सन्निरोद्धव्या त्याज्या वा कुलसन्निधौ |

म्हणजे नव-यानें सकारण दुसरा विवाह केला असतां जी स्त्री रागावून घराबाहेर जाईल तिला एकदम पकडून आणावी; किंवा तिचा बांधवासमोर त्याग करावा. साराश, अधिवेदन म्हणजे पहिली स्त्री असता काही कारणाकरितां दुसरा विवाह करणें. हा अधिकार पुरूषासच आहे. पुरूषांस हा अधिकार आहे म्हणून नव-यास सोडून स्त्रीस पित्याच्या घरीं राहता येत नाहीं. नव-याने पूर्वोक्त कारणाकरिता दुसरे लग्न केलें तरी स्त्रीने त्याचे जवळच राहिलें पाहिजे व त्यासही तिला अन्नवस्त्र दिलें पाहिजे. नाहींतर दोघासही दंड आहे. अधिवेदनाचा आणि नव-याने बायकोचा किंवा बायकोनें नव-याचा केव्हा त्याग करावा याचा कांहीं एक संबंध नाही. आणि पतीचा अशा रीतीनें त्याग करणा-या बायकोस रा.ब.नीं सागितल्याप्रमाणे 'अधिविन्ना' कदापि म्हणतां येणार नाहीं. स्त्री दारूबाज किंवा पुरूषद्वेषिणी असली तर नव-यास दुसरा विवाह करता येतो, पण नवरा दारूबाज वगैरे असून त्याचें व स्त्रीचें पटत नसल्यास स्त्रीस त्यास सोडता येत नाहीं, असें मनूत स्पष्ट सांगितले आहे; त्यांस युक्तिवादास जागा नाहीं. फक्त नवरा जर नपुंसक,