पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ लो. टिळकांचे केसरीतींल लेख

पतित, वेडा किंवा महारोगी असेल तर मात्र या चार कारणाकरिता स्त्रीनें त्याचा त्याग केल्यास ती दोषार्ह होत नाहीं. बाकी त्यास दमा आहे, तो गरीब आहे, त्याचा माझा द्वेष आहे वगैरे कारणाकरिता जर स्त्री पुरूषाचा त्याग करील तर तें साहस समजून त्यास स्मृतिग्रंथातून राजदंड सागितला आहे. हा दंड काय आहे त्याचा आता विचार करूं.

स्त्रीपुंव्यवहार

पतीचा त्याग करणा-य स्त्रीस जर राजदंड आहे तर नवराबायकोचा खटला राजाकडे अवश्य गेला पाहिजे. नवराबायकोची एकमेकावर फिर्याद होत नाहीं म्हणून जे रा.ब. म्हणतात तें अगदीं सामान्य वाक्य आहे. म्हणजे होईल तेवढें करून राजानें असल्या फिर्यादी आपापसांत मिटविण्यास सागाव्या एवढाच त्याचा अर्थ आहे. रा.ब.नीं हीही गोष्ट जुलमानें कबूल केल्यासारखी आहे; पण आम्ही त्यांस असें सांगतों कीं, येथें असल्या ओढाताणीची काहीं गरज नाहीं. आमच्या शास्त्रकारानीं या गोष्टीचा निकाल केला आहे. विज्ञानेश्वरानीं या विषयावर खाली दिल्याप्रमाणें आपला सिद्धात दिला आहे:------ यत्तुस्मरणं - "गुरो: शिष्ये पितु: पुत्रे दंपत्यो: स्वामिभृत्ययो: | विरोधे पि मिथस्तेषां व्यवहारो न सिध्यति ||" इति तदपि गुरूशिष्यादिनामात्यंतिक व्यवहार प्रतिषेधपरं न भवति | तेषामपि कथंचिद्व्यवहारस्येष्टत्वात् तथाहि शिष्यादिशिष्टिरवधे नाशक्तौ रज्जुवेणुविदलाभ्या तनुभ्यामन्येन घ्नन् राज्ञा शास्य इति गौतमस्मरणात् यदि गुरू: कोपावेशवशात् उत्तमांगे ताडयति यदा स्मृतिव्यपेतेन मार्गेणाधर्षित: शिष्यो राज्ञे निवेदयति तदा भवत्येव व्यवहारपदं | ......... तथा दुर्भिक्षे धर्मकार्ये च व्याधौ संरतिरोधके गृहितं स्त्रीधन भर्ता नाकामो दातुमर्हतीति स्मरणात् दुर्भिक्षादि व्यतिरेकेण यदि स्त्रीधनं भर्ता व्ययीकृत्य विद्यमान धनो पि याच्यमानो न ददाति तदा दंपत्योरपि इष्यते एवविवाद: | ... तस्मात् दृष्टादृष्टयो: श्रेयस्करो न भवति गुर्वादिभिर्व्यवहार इति प्रथमं शिष्यादयो निवारणीया: राज्ञा ससभ्येनेति "गुरो: शिष्य" इत्यादे: श्लोकस्य तात्पर्यार्थ:| अत्यंतनिर्बंन्धे तु शिष्यादिनामपि उक्ततीत्या प्रवर्तनोयो व्यवहार: | म्हणजे इंग्लंडात हल्ली ज्याप्रमाणें नवराबायको मिळून कायद्यात एक व्यक्ति मानतात तरी नव-यानें बायकोस मारिल्यास तिची त्यावर फिर्याद चालते; तशीच जरी "या भर्ता सा स्मृतांगना" अशी स्मृति आहे तरी तिचा अर्थ इतकाच घ्यावयाचा कीं साधारणरीत्या राजाने हे खटले आपल्यापुढे येऊं देऊं नयेत. बाकी नवरा बायकोस मारील किंवा तिचे स्त्रीधन घेईल तर व्यवहार म्हणजे फिर्याद होण्यास कांहीं हरकत नाहीं. असें जर नसेल तर:--

स्त्रीबालोन्मत्तवृद्धानां दरिद्राणा च रोगिणा
शिफाविदलरज्ज्वाद्यै: विदध्यान्नृपतिर्दमं |