पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कंठस्नान घालावे लागले, व एकाला पदच्युत करुन त्याच्या जागी परदेशाचा इसम आणून बसवावा लागला! राजकीयसंबंधाने इंग्लिश लोकांनी सतराव्या शतकात इतका झपाटा मारिला तरी त्याला साजणारी त्यावेळेस किंवा आता त्यांची गृहस्थिति नाही हे ज्यांनी मेकॉले, मिल्ल वैगेरेंचे गंथ पाहिले आहेत, इंग्ल्ंडची सफर केली आहे किंवा दुसऱ्या कोणत्याही रीतीने इंग्लिश समाजाचे ज्ञान करून घेतले आहे त्यांना दिसून् येईल. आता आमच्या बायका जशा अक्षरशत्रु आहेत तशा इंग्ल्ंडच्या सतराव्या शतकांत होत्या. आता आम्हात जशी काही सामाजिक लफडी आहेत, तशी इंग्लंडातही आहेत. इंग्लंडची गृहस्थिति आमच्यहून फार चांगली आहे हे अगदी मान्य आहे, पण ती असावी तशी नाही हे निर्विवाद आहे. सारांश काय की. गृहस्थितीचा राजकीय स्थितीशी सार्वत्रीक व सार्वकालिक समवायसंबंध लावणे नीट नाही. येथे व्याख्यानाचा पुर्वाध झाला.

उत्तरार्ध

मागल्या निबंधात शिरोलेखात नमुद केलेल्या विषयाच्या संबंधाने आ. काशिनाथ पंत तेलंग यांच्या व्याख्यानाच्या पुर्वार्धाचा सारांश दिला. यात उत्तरार्धाचा देउन अवकाश रहिल्यास विषयासंबंधाने आमचा अभिप्राय द्यावयाचा.

अमुक देशात अमुक प्रकारची सामाजिक स्थिती असली म्हणजे त्या देशांत अमुक प्रकारची राजकीय स्थिती असलीच पाहिजे असे जे कित्येकांचे म्हणणे आहे ते चुकीचे आहे हे दाखवण्यासाठी आतापर्यंत काही ठळक ठळक अशी सम प्रमाणे दाखविली. आतां वरील माझे मत व्यस्त प्रमाणानी सिध्द करुन दाखवितो. तारतम्यदृष्टीने पाहिले असता ज्या मार्गाने कार्यशकटाच्या चक्रास कमीत कमी घर्षण होईल अशाने तो नेण्यात मनुष्याचा फायदा आहे हे कोणीही कबूल करील. ज्या रस्त्यावर खाचखळगे नाहित, ज्यावरील मुरुम दाबून बसविलेला आहे, ज्याने प्रवास केला असता भामट्यांची भिती नाही व जो नेहमीच्या रहदारीचा आहे अशाने जाणे अत्यंत श्रेयस्कर आहे. हिंदुस्तान सारख्या महाव्दीपतुल्य देशात सामाजिक सुधारणा लवकर घडून आणणे अत्यत दुरापास्त आहे; व पूर्वीची स्थिती आज असती तर राजकीय सुधारणाही सामाजिक सुधारणे पेक्षा अधिक सुलभ झाली नसती. देशाच्या निरनिराळ्या भागावर जर स्वतंत्र राजे राज्य करीत असते तर सर्वांचे राजकीय विचार एकसारखे होउन सर्वांनी एकमेकांशी सलोखाने वागण्यास आरंभ होउ लागण्यापूर्वी पुष्कळ् वर्षे लोटली असती. परंतु इश्र्वरेच्छेने या विस्तीर्ण भारतभूमीवर इंग्रजांसारख्या अत्यंत सुधारलेल्या व उद्योगी लोकांचे साम्राज्य झाले असल्यामुळे राष्ट्राराष्ट्रातील चुरस नाहिशी झाल्यासारखी होउन् सगळे प्रांत एका दावणीत गोवले गेले आहेत, त्यामुळे राजकिय प्रकरणात तरी त्यांचा एकमेकांशी फारसा बेबनाव होण्याचा संभव राहिला नाही. राजकिय दृष्ट्या सर्वांच्या कपाळी सारखे दास्य आले आहे; व त्यातून पार पडण्याची सगळ्याची