पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ लो. टिळकांचे केसरीतील लेख

व दुसऱ्याला गुलाम अशा संज्ञा देणे न्याय्य आहे. पण आमच्या घरी अगदी उलट स्थिति आहे. साहेबलोक ज्यांना गुलाम म्हणतात त्या स्वामिनी आहेत व ज्यांना ते स्वामी म्हणतात ते त्यांचे बंदे गुलाम आहेत! बायकांच्या पायांत् आम्ही बिडी घातली आहे असे नाही, तर त्या आम्हांस् सव्वामणाच्या जड बिडीसारख्या होउन गेल्यामुळे आमचे पाय हलेनासे झाले आह्ते. अथवा आम्ही बायकांचे किंवा बायका आमच्या गुलाम हाच वाद बरोबर नाही. आम्ही - आमच्या बायका - आमच्याबहिणी, मुली-मुले-आम्ही सारे केस पिकलेल्या अनादिसिध्द पुराणलोकरुढीरुप जगदंबेचे अतिलीन गुलाम आहो! तिचे उग्र स्वरुप डोळे उघडून न्यहाळण्याचे धैर्य आम्हास होत नाही! ही महिषासुरमथनी भारलेल्या जंतूंप्रमाणे आम्हांस वागवीत आहे व आम्ही वागत आहो!तेव्हा आम्ही आपल्या बायकांस गुलामाप्रमाणॅ वागवितो, हा साहेबलोकाकडून आम्हावर होत असलेला आरोप माझ्यामते अगदि निराधार आहे! आता दुसरा प्रश्र्ण असा आहे की, अमुक प्रकारची गृहस्थिती असली तरच अमुक प्रकारची राजकीय स्थिती प्राप्त होईल, नाहितर व्हावयाची नाही- हे जे कित्येकांचे म्हणणे आहे ते इतिहासावरून सिध्द होत नाही. शिवाजीने मराठ्यांच्या राज्याची स्थापना केली; पेशव्यांनी गंगेत व सिंधूत दक्षणी तट्टे नहावून अटकेस भगवा झेंडा फडकविला, तो काय हायस्कुलात जाउन चवथी इयत्ता शिकणाऱ्या मुलीच्या जोरावर? शिवाजी, महादजी शिंदा, थोरला बाजीराव- हे काय पाचविसावे वर्षी लग्न केलेल्या मुलींच्या पोटी झाले होते? त्यावेळी शुद्रब्राम्हणाची ताटे काय एके ठिकाणी होती? का त्यावेळेस सती हा शब्द् कोणास ऐकूनसुध्दा ठाउक नव्हता? काही नाही. आतापेक्षा त्यावेळाची गृहस्थिती विशेष चांगली होती असे मानण्यास काही आधार नाही. शिवाजीच्या पूर्वीचा काळ घेतला तरी तेच दिसून येईल. सातव्या शतकातील हर्षवर्धन आणि पुलकेशी राजांच्या कारकिर्दीविषयी जी माहिती उपलब्ध आहे तीवरून त्या वेळाच्या लोकांची गृहस्थिति आतापेक्षा विषेश बरी होती, असे मानण्यास काही आधार नाही. आता कोणी असे म्हणतील, की हे हिंदुस्थानचे उदाहरण काही कामाचे नाही. येथला खरा इतिहास सापडाण्याचे साधन नाही; सबब् ज्या देशाचा खरा इतिहास उपलब्ध आहे त्याचे उदाहरण घेतले पाहिजे. कबूल आहे. अशा प्रकारच इतिहास इंग्लंडच्या इतिहासाहून दुसरा कोणता आहे? पण त्या इतिहासावरुन सुध्दा देशातील लोकांची अमुक प्रकारची गृहस्थिती असेल तरच अमुक प्रकारची राजकीय स्थिति असू शकते, हे जे कित्येकांचे म्हणणे आहे ते सिध्द होत नाही. सतराव्या शतकात राजकीयसंबंधाने इंग्लिश लोकांचे पाउल पुष्कळच पुढे पडले. ट्युडर घराण्यातील राजेराण्याचा जारी अंमल संपल्याबरोबर हक्क मागण्याची जी टिका लिकांनी एकदा हाती धरली ती शंभर वर्षेपर्यंत खाली ठेवली नाही. राजांचे वर्चस्व कमी करुन लिकांचे हक्क निश्र्चित करण्यासाठी एका राजाला