पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साठवले ब्रह्मांड नायकाला
एक वेळ भेट करा मजला॥

 आणि नामदेवाचे गर्वहरण झाले. हे पाहून मग स्वत: विठ्ठलच सावता माळ्याच्या पोटातून बाहेर आले. सर्वांनी विठ्ठलाला नमस्कार केला. नामदेवालाही विठ्ठलाने हे कशासाठी केलं, हे ध्यानात येतं. ज्ञानदेवही नामदेवाला म्हणतो, 'तुझं अहंकाराचं पाप आता धुवून निघालं आहे.'
 हे लोककथागीत संतपरीक्षा म्हणून प्रसिद्ध आहे. देवावरील भक्ती. देवानं भक्ताची घेतलेली परीक्षा एक वेगळा अनुबंध प्रकट करणारं आहे.

 लोकसंस्कृतीत वेगवेगळ्या अनुषंगानं अनेक लोककथागीतं प्रचलित आहेत. ही गीतं प्रसंगी माणसाचं मन रिझवतात; पण त्याचबरोबर परंपरेचा लोकजीवनाचा एक खजिना जपून ठेवतात व पुढच्या पिढीपर्यंत पोचवतात, हे नक्की.

लोकसंस्कृतीचा गाभारा ।। ८९ ॥