पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दान पावलं

 सकाळचा प्रहर. घराघरांतून पहाटेची जाग, अशावेळी अंगणातून गाणं ऐकायला येऊ लागतं...

जगजीवन रामा
लामा बहारबंबा
गोविंद रामा
बाजीराव नाना
तुमडीभर दिना
शंकराच्या नावानी
पांडुरंगाच्या नावानी
हरिभाऊच्या नावानी
भाग्यीवंत माऊली
सकाळच्या रामपाऱ्यामंदी
वासुदेवाचं लेकरू आलं
माइला धर्म पावला, दान पावलं...

 या गाण्याबरोबर घुगराचा आवाज, टाळ-चिपळ्यांचा आवाजही. वासुदेव आला गंऽऽ' म्हणत कोणी वृद्ध स्त्री मग लेकीबाळींना आवाज देते.
 हे दृश्य खेड्यापुरतेच मर्यादित राहिले. काही दिवसांनी ते सुद्धा नष्ट होते की काय, अशी भीती आहे.
 वासुदेव पहाटेचा दारात आला, की त्याला पाहायला आम्ही पहाटेचे उठून दारात अंगणात जायचो. त्याचा वेषही आम्हाला पाहायचा असायचा. सलवार, अंगात घोळदार अंगरखा, गळ्यातून वेगळ्या लाल-हिरवा रंगाचा थोडी जर असणारा जुनापुराणा शेला, काखेला पांढऱ्या कापडाची झोळी. मिळालेल्या धान्यानं ती थोडी फुगलेली असायची. कपाळाला उभा गंध रेखलेला असायचा. कानाच्या पाळीला आणि डोळ्यांलगत कानाच्या जवळ गंधाचे बोट लावलेले असायचे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे डोक्याला मोरपीसं लावलेली शंकूच्या आकाराची टोपी असायची. एका हातात चिपळ्या आणि दुसऱ्या हातात टाळ असायचे. कमरेला बासरी बांधलेली असायची. आम्ही मुलं त्याचं ते साजरं रूप पाहायला भोवतीनं गोळा झालो, की दोन्ही हात उंचावून टाळ-चिपळ्या वाजवत गोल गिरक्या घेत तो नाचायचा. पायही तिथल्या तिथं नाचवल्यासारखा करायचा. त्याच्या पायालाही लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ६१॥