पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वातंत्र्याचा, तिच्यावर लादलेल्या धार्मिक मानसिक गुलामगिरीचा, तिच्या झालेल्या कोंडीचा आणि त्यातून सुटण्यास ती करत असलेल्या धडपडीचा प्रयत्न शब्दबद्ध झालेला आहे. खूपदा ही धार्मिक प्रथा समाजातल्या संधिसाधू लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी वापरलेली दिसते. यातून तिची सुटका व्हावी म्हणून अनेक सामाजिक कार्यकर्ते व संस्थाही काम करत आहेत. सर्वसामान्य भोळ्या भाबड्या जनतेच्या मनात मात्र यल्लमाविषयी भक्ती आणि श्रद्धा मात्र चिरंजीव आहेत. अजूनही लाखोंच्या संख्येने सौंदत्तीची यात्रा भरते, ही त्याचीच साक्ष आहे.

लोकसंस्कृतीचा गाभारा॥ ५९॥