पान:लोकहितवादी.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वर्णव्यवस्था. पहावे व लोकांचे तोंडून ऐकावें तेव्हां समक्ष भेट झाली तर चांगले की नाही याचा विचार पहावा. तेव्हां साक्षात् शहाणे लोकांची गांठ पडून हिंदू लोकांच्या वाईट चाली बहूत सुटल्या व आणखीही किती एक सुटतील आणि त्यांची मनें शुद्ध होऊन त्यांस राज्यकारभार, व्यापारधंदा कसा करावा हे ज्ञान येईल. देशसुधारणा क्षणांत होत नाहीं, तीस पुष्कळ विलंब लागतो. लहानमुलांस शहाणे होण्यास दहावीस वर्षे लागतात, मग हा देश चांगला होण्यास दोनचारशे वर्षे लागतील. तोपर्यंत या लोकांस दुःख आहे. परंतु त्यास उपाय नाहीं. जशी शाळेमध्ये मुलांनी शिक्षा घेतली पाहिजे तद्वत् हे आहे. यापासून उत्तम फळ पुढे होईल. या देशाचे लोकांनी वर्णसंकर होईल व धर्म बुडेल हे कांहीं भय बाळगू नये. वर्णसंकर होत नाही व धर्म बुडत नाही. परंतु मूर्खपणा मात्र बुडेल. धर्मामध्ये अधर्म भेसळ झाला आहे; त्यास लोक अधर्म म्हणतात. तें मात्र ज्ञानचक्षु आल्यावर जाईल. वर्ण जे आहेत ते स्वाभावीक सृष्टीत आहेत. म्हणजे कोणतेही देशांत वर्ण नाहीत असें नाहीं वर्ण म्हणजे इतकेंच की; चार प्रकारचे व्यापार. ते सर्व देशांत नेहमीं असावया वेच. मात्र हल्ली जो वर्णसंकर आहे म्हणजे वारतवीक ब्राह्मण नसतां ब्राह्मण म्हणवितात; शूद्रअसतां ब्राह्मण म्हणवितात व ब्राह्मण असतां ब्राह्मण म्हणत नाहीत; हा वर्णसंकर मात्र जाईल, आणि व्यवस्थीत होईल.........लोक शहाणे झाले म्हणजे इंग्रजांस म्हणतील की, तुम्हांसारखेच आम्ही शहाणे आहों; मग आम्हांस अधिकार का नसावे ? मग हिंदू लोकांचे असें बहुमत पडले म्हणजे सरकारास देणे अगत्य आहे. इकडील लोक राज्याचा कारभार चांगला करूं लागले, लांच खावयाचे सोडून दिले म्हणजे मोठाली कामें गर्व्हनराची सुद्धा त्यांचे हातीं येतील. आणि आपले