पान:लोकहितवादी.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकहितवादी. वाङ्मय, इंग्रजी तत्त्वज्ञान, इंग्रजांचा इतिहास, इंग्रजी संस्कृती यांचे महत्त्व या कारणांमुळे इतर प्रांतांपेक्षां पुष्कळच अधीक होते व अजूनही आहे. महाराष्ट्रांत मात्र असा प्रकार झाला नाही. कसे झाले तरी महाराष्ट्रांत स्वराज्य होते. तेव्हां तें ज्यांनी घेतले त्याबद्दल येथील प्रजेच्या मनांत, विशेषतः जहागीरदार, इनामदार, देशमूख, देशपांडे यांच्या मनांत--स्वराज्य गेल्यामुळे ज्या पांढरपेशावर्गाचे प्रत्यक्ष आर्थीक नुकसान झाले त्यांच्या मनांत-थोडीशी तेढ राहिलीच. - त्यामुळे नवीन संस्कृतींत जे काही चांगले होते तेवढे घेण्याचे धाडस किंवा जुन्यांत जरूर तेवढाच फरक वेळीच करण्याची सुबुद्धी त्यांना झाली नाही. लोकांचे नैसर्गीक पुढारी परिस्थितीला पाठमोरे होऊन कचरले व बुद्धीने, करामतीनें, हिमतीने तरूण पण खानदानींत कमी अशा उपऱ्या लोकांना पुढे येण्याची संधी मिळाली. पेशवाईच्या अखरच्या दिवसांतच अशा बुद्धिमान व कर्तृत्ववान लोकाना स्वराज्यांत वाव नाहीसा झाला होता. एरवीं, ज्या रीतीने नाना फडणवीस, हरिपंत फडके, किंवा पटवर्धन मंडळी पेशवाईच्या आरंभी आपल्या आंगच्या गुणांनी झटकन् पुढे आली, त्याप्रमाणे बाळाजीपंत नातूंसारखा धोरणी व कर्ता परुष रावबाजींच्या अमदानींत पुढे यावयाला काय हरकत होती? पेशव्यांनी यांना पुढे आणलें नाहींच; पण त्यांच्यासारखी मंडळी हाताशी धरून चतुर इंग्रजी मुत्सद्यांनी आपला मात्र डाव साधून घेतला. पण अर्थातच या उपऱ्या मंडळीचे महाराष्ट्रांतील लोकावर वजन कधी पडलें नाहीं व त्यामुळे इंग्रजांनीही यांना आपल्या कामापलीकडे कधी फारसें विश्वासात घेतले नाही. घडून आलेल्या क्रांतीच्या दिवसांत या मंडळींनी आपल्या पोळीवर तूप ओढून घेतले खर. पण त्या बरोबरच जुन्यानव्याचा सांधा बसवावयाचे काम मात्र कल नाही असे मोठ्या खेदाने म्हणावे लागते. घडून आलेला फरक इतका