पान:लोकहितवादी.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शेवट. . झाला होता. स्वामींनी आपल्या अखेरच्या दिवसांत आर्यसमाज या संस्थेची सार्वजनीक व्यवस्था करून ठेविली त्यांत गोपाळराव एक Trustee होते. या कामासंबंधाने त्यांना वरचेवर उत्तर हिंदुस्थानांत जावे लागे. अशा एका प्रसंगी रतलामच महाराज व गोपाळरावजी यांची गांठ पडली. व यांच्या निस्पृहपणाचा व कर्तेपणाचा त्यांच्या मनावर इतका परिणाम झाला की, त्यांनी माझी दिवाणगिरी पतकरा अशी गोपाळरावजींस गळ घातली व मोठ्या मिनतवारीने ती यांनी कबूल केली. पण वृद्धापकाळामुळे काम होईना. लवकच गोपाळराव ती नोकरी सोडून परत आले. शेवटच्या दहाबारा वर्षांत त्यांच्यावर कौटुंबीक माणसांच्या वियोगाचे प्रसंग वारंवार आले. तीन वडील मुलगे, बायको, दोन मुली, एक जांवई वगैरे जिव्हाळ्याच्या माणसाच्या मृत्यूंनी त्यांचे मनावर व शरीरावर फारच परिणाम झाला होता. तरी सर्व दुःखें विवेकानें गिळून ते शेवटपर्यंत पुण्याच्या सार्वजनीक कामांत पडत असत. कोठेही लहान मोठी सभा असो तेथे आपली गोपाळरावांची स्वारी हजर असावयाची व त्यांच्या विचाराचा फायदा सर्वाना सर्वत्र मिळावयाचा. त्यांच्या तरूण मनाची तडफ कधीच कमी न झाल्यामुळे त्यांच्या त्या व्यवसायांत खंड - पडल्यास त्यांनाच करमेनासे होई. असे चालले असतां १८९२ साली दसऱ्याच्या दिवशी घोड्यावरून सीमोल्लंघनास गेले असतांना त्यांना पाऊस लागून ताप आला. दोनतीन दिवस अंगावर काढून राहिले. शेवटी दुखणे विकोपास जाऊन ता. ९ आक्टोबर रोजी त्यांचा अंत झाला ! -गोपाळरावजींच्या आयुष्यातील ठळक गोष्टी आतापर्यंत सांगितल्या त्यावरून ते कोणत्या प्रकारचे पुरुष होते, त्यांचा स्वभाव, त्यांचे शील त्यांचे खाजगी व सार्वजनीक चारित्र्य कसे होते याची थोडीशी