पान:लोकहितवादी.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

1904 प्रस्तावनेचे चार शब्द. ‘लोकहितवादी' सरदार गोपाळराव हरी देशमुख यांचा जन्म होऊन चालू साली शंभर वर्षे झाली. या शतसांवत्सरिकाच्या निमित्ताने येथील डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटीने त्यांचे ग्रंथ व कार्य यांविषयी चर्चात्मक निबंध मागविले होते. त्या जाहिरातीला अनुलक्षून व तीत आखून दिलेल्या मर्यादेनुसार हा निबंध लिहिला व तो सोसायटीने पसंत केला. __ हा निबंध म्हणजे अर्थातच चरित्र नव्हे. तत्कालीन सामाजीक परिस्थिती, लोकहितवादींची मते, त्यांचा त्या परिस्थितीशी संबंध वगैरे गोष्टींची चर्चाच यांत विशेषतः सांपडेल. चरित्राचीही माहिती थोडी फार दिली आहे; व तीही चारित्र्याचा बोध व्हावा या हेतूने दिली आहे. ती जेथून मिळाली त्या त्या प्रमाणे निर्देश पुस्तकांत केला आहे. रा ० रा ० आठल्ये यांनी लिहिलेल्या अप्रकाशित चरित्रांतून घेतलेल्या गोष्टींचा उपयोग करण्याची परवानगी लोकहितवादींचे चिरंजीव डॉ० नानासाहेब यांनी दिली; निबंधाची आंखलेली रूपरेखा पाहून तिच्या संबंध ने उपयुक्त सूचना दुसरे चिरंजीव रा०आप्पासाहेब देशमुख यांनी केल्या; लोकहितवादींच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेले वर्तमानपत्रांतील लेख व इतर बरीच उपयोगी कागदपत्रे माझे मित्र रा० शरश्चंद्र वामन रानडे यांनी दिली; याशिवाय बारीकसारीक मदत पुष्कळांचीच झाली आहे. त्या सर्वांचा मी अत्यंत उतराई आहे. हे निबंध लिहून काढण्याच्या मेहनतीचे बरेचसे काम माझे मित्र रा० द. ल. गोखले व रा० भा. वि. साने यांनी केले व त्यामुळेच वेळेवर निबंध तयार झाला.