Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/४१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ४०५

पुढारी होते. त्यांनी जी गडबड उडवून दिली तिला त्यांच्या नावावरून 'भालेराई' असे म्हटले गेले.
 (२) होळकरी गर्दी - पृष्ठ—- वरील (पूर्वी होळकरांनी पुणे शहर लुटून लोकांस मारिले ही) टीप पाहा.
 (३) पेंढारी- मोगलांच्या पडत्या काळात हे लोक पुढे आले. वाटेल त्या राज्याच्या सैन्याबरोबर बाजारबुणगे म्हणून हे जात असत. यांना नेहमीचा पगार असला तरी लुटीतील काही भाग आणखी दिला जात असे. यांनी स्वतंत्रपणेही पुष्कळ लूटमार केली. इंग्रजांच्या राजवटीत यांचा आश्रय तुटला. तेव्हा तर यांच्या लूटमारीस फारच ऊत आला. (पुढे लॉर्ड हेस्टिंग्जने त्यांचा नायनाट केला.)

♦ ♦