Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३९४: शतपत्रे

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी 'राधामाधवविलासचंपू' च्या प्रस्तावनेत (पृ. १०७) फार चांगली केली आहे. तीही या ठिकाणी लक्षात घेण्याजोगी आहे. "उत्तम, रेखीव व नेमके हत्यार बनविण्याची कला पैदा होण्यास शास्त्रीय ज्ञानाची जी पूर्वतयारी राष्ट्रात व्हावी लागते ती त्या काळी महाराष्ट्रात नव्हती. शहाजीच्या हयातीत युरोपात डेकार्ट, बेकन इत्यादी विचारवंत, सृष्ट पदार्थ संशोधनकार्याचे वाली, ज्यारीने पंचभूतांचा शोध लावण्यास लोकांना प्रोत्साहित करीत होते. आणि आपल्या इकडे एकनाथ, तुकाराम, दासोपंत.. इत्यादी संत पंचभूतांना मारून ब्रह्मसाक्षात्कारात राष्ट्राला नेऊन मुक्त करण्याच्या खटपटीत होते. अशांना स्क्रू, टाचणी, बंदूक व तोफ यांचा विचार वमनप्राय वाटल्यास त्यात नवल कसचे?"
 हिंदुस्थानातील लोकांनी आपल्या राजवटीत शोध केला नाही हे यावरून स्पष्ट होईल. (अधिक माहितीसाठी जिज्ञासूंनी प्रा. द. के. केळकर यांच्या 'संस्कृतिसंगम' व 'उद्याची संस्कृती' या ग्रंथातील अनुक्रमे 'विचारदौर्बल्याचे शेवाळे' व 'धर्मांची रेशमी काढणी' ही दोन प्रकरणे वाचावी.)

पृष्ठ २१८: त्यांची ती कायम.. पेशव्यांचेच बुडाले
 शिंदे, होळकर, गायकवाड, हे पेशव्यांचे सरदार होते. पेशवे त्यांचे प्रभु असले तरी त्यांच्या प्रदेशात (संस्थानात) त्यांचा अधिकार असे. १८१८ साली पेशव्यांचे राज्य बुडाले. पण इतर 'संस्थानिक' होऊन पूर्ण शरणागती पत्करून टिकून राहिले.

पृष्ठ २२१: जर छापखाना व डाक हिंदुस्थानात असती
 'अव्वल इंग्रजी' मध्ये सुज्ञांना मुद्रणविद्येचे (महत्त्व लक्षात आल्यामुळे) फार अगत्य वाटले हे कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या 'अनेकविद्यामूलतत्त्वसंग्रहां'तील पुढील विधानांवरून लक्षात येईल. "छापण्याची युक्ती न निघती तर वर्तमानपत्रे व नियमित काळी निघणारी पुस्तके न होती. हल्ली पृथ्वीवर एका महिन्यात जितके कागद छापले जातात, तितके हाताने लिहावयाचे असते तर कोट्यवधी मनुष्ये लागली असती. परमेश्वराने अप्रतिम व अत्युत्तम कला, विद्यास्वातंत्र्य- सौजन्य-संपत्ति इत्यादी उत्तमोत्तम गोष्टी उत्तरोत्तर वाढाव्या म्हणून पाठविली."
 इंग्रजी अमलात मुद्रणविद्येविषयी जे अगत्य लोकांस वाटले ते पेशवेकालीन महाराष्ट्रातील लोकांस वाटले नाही. "योगवासिष्ठासारख्या एका पोथीची नक्कल