पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रस्तावना


 १००१ साली गझनीच्या महंमदाने अटक नदी ओलांडून भरतभूमीवर आक्रमण केले, आणि तेव्हापासून आजपर्यंत सर्व भरतभूमि स्वतंत्र आहे असा एक क्षणहि इतिहासांत उगवलेला नाही. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले; पण ते खंडित भारताला, सर्व भूमीला नव्हे. जवळ जवळ एक तृतीयांग भारत अजूनहि दास्यांतच आहे. पण हे मर्यादित स्वातंत्र्यहि आपण पुरती सात वर्षे सुद्धा टिकवू शकलों नाहीं. १९५४ सालींच शत्रूने भारताचा एक मोठा विभाग तोडून घेतला.
 या भरतभूमीचे सुपुत्र तिच्या स्वातंत्र्याने रक्षण करण्यास समर्थ आहेत असे या इतिहासावरून म्हणतां येईल काय ? अफगाण, तुर्क, मोगल, शिद्दी, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज- कोणीहि यावे, या भूमीवर आक्रमण करावें आणि येथे शतकानुशतक सुखाने राज्य करावें अशी आपली स्थिति आहे. या लूटमारीत, आपणच मागे कां राहावे, असा विचार मनाशी करून चीनहि आता तींत सामील झाला आहे. दुर्दैव असे की, आपण मात्र आहों तसेच आहों. असंघटित, अराष्ट्रीय, देशद्रोही, धर्महीन, चारित्र्यहीन, बेसावध, असाक्षेपी, अवास्तववादी, अकार्यक्षम, वाचीवीर, कृतिशून्य आणि म्हणूनच दरिद्री, करंटे, असमर्थ, दुर्बल, दीन !
 असें कां व्हावें याचा अगदी मूलगामी विचार भारतीयांनी केला पाहिजे. त्याच दृष्टीने या ग्रंथात विवेचन केलं आहे.
 सोव्हिएट रशिया व नवचीन या सध्याच्या जगांतल्या दोन प्रबळ अशा दण्डसत्ता आहेत. त्यांचा सर्व इतिहास ४०-५० वर्षांचा आहे. चीनचा तर दहा-पंधरा वर्षाचाच आहे. तरी अमेरिकेसारख्या अत्यंत बलाढ्य व प्रौढ लोकसत्तेला व इंग्लड, फ्रान्स, पश्चिम जर्मनी यांच्या संघटित सामर्थ्याला आव्हान द्यावें इतके सामर्थ्य त्यांना कसे प्राप्त करून घेता आले, कोणत्या तत्त्वांची व शक्तींची उपासना त्यांनी केली याचे विवेचन पहिल्या प्रकरणांत केले आहे. हे आव्हान अमेरिकेला स्वीकारता येईल काय आणि आले तर