पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण सहावें : १९९

भावना नागरिकांत बाणली पाहिजे आणि तसा आचार घडला पाहिजे. रशियाने हें सर्व क्रूर, कठोर अशा दण्डसत्तेच्या साह्याने घडविलें आहे. 'तुम्ही व्यक्तिस्वातंत्र्याचे, अहिंसेचे, लोकशाहीचे अभिमानी म्हणवतां. तर त्या मार्गाने तुम्ही हें करून दाखवा' असें दण्डसत्तेचें लोकसत्तेला आव्हान आहे. वरील प्रकारची धर्मक्रांति आपल्याला घडवितां येते की नाही यावर याचें उत्तर अवलंबून आहे.

+ + +