Jump to content

पान:लोकमान्य मेळा १९२३ ची पद्यावली.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११ ) । वजवजपुरि ही सारी झाली । कोणि कुणाला विचारिना। देशभक्त ते सारे बनले | शिवाजिचे अवतार ॥ १ ॥ करी भाषणे खुसखुशीत तीं । देशभक्तिनें भरलेलीं । अंतर त्याचे देवचि जाणें । स्वार्थाचा व्यवहार ॥ २ ॥ फंडाचें तें बंड जाहलें । वितंड वादी बहु जमले । कुंड पेटलें कलहाचें तें । देश त्यांत जळणार ॥ ३ ॥ टराव करिती एक परीचा उलट कृतीने आचरती । नांव बुडविती राष्ट्र सभेचें | इसे जगीं होणार ॥ ४ ॥ चार दिवस कारागृहिं गेला । देशभक्तिनें हा भरला । तोंड टाकुनी सकलांवरती । शिकवी उलटा न्याय ॥५॥ देशभक्त जे भिन्न मतांचे । राजकारणी कसलेले । मूर्ख तयातें ठरवि पोर हा खेळकरी गुलजार ॥ ६॥ गांधी टोपी डोक्यावरतीं । विलायतेचें धोतर तें । पुराण सांगे खादी बरती । “देशभक्त" बनणार ॥ ७ ॥ जगता सांगै चहा सोडणें । राष्ट्र भक्तिची खूण असे । किटल्या उडवी घरीं चहाच्या । पाव तोहि खाणार ||८|| असहकारिता करा म्हणतसे । उंच स्वराने सांगतसे । सरकारी कंत्राट घेत हा । पैसा गळिं पडणार ॥ ९ ॥ व्यक्ति द्वेष हा जगीं वाढला । कोणी सज्जन दिसेचना | राष्ट्रकाज तें दूर पळालें । स्वार्थावरि टपणार ॥ १० ॥