( 20 ) टीका करिती आम्हांवरती | वोकळं द्या आम्हांला ॥ ११ ॥ संस्कृति आपुली टाकुनि त्यांना । सुचती ढंग नवनवे । इंग्रजी फॅशन बूट आवडे । बुचडे तेही फुगवे ॥ १२ ॥ फिरावयासी निधे "फुटाणी" । पति सांभाळी पोरा । समान हक्का पहा गाजवी । सुशिक्षीत तो नवरा ॥ १३ ॥ काम धाम ते तिला नावडें । पुस्तक वाचित बसली । आये स्त्रियांच्या कथा नको त्या । कादंबरि करिं आली १४ ॥ गायन शिकली पहा लाडकी पति पेटी वाजवितो । रुदनाचा खर बालक मिळवी । जलसा खासा होतो ।। १५ ।। शिक्षण द्यावें जरी स्त्रियातें धर्महि तो शिकवावा । आजचे शिक्षण पहा शिकवितें। स्वधर्म तो विसराया ॥ १६ धर्म दक्षता करारीपणा । सकलां-मधुनीं गेला । स्वदेश सेवा जनां नावडे । धन्य काळ तो पहिला ॥ १७ ॥ ऐशी कुदशा आम्हां आली । धांवे गणेश देवा ॥ देइ सुबुद्धी निज वाळासी । करवी स्वदेश सेवा ।। १८ ।। जागे व्हारे पूर्व दिशेचा । 'भास्कर' उदया आला । ढंग त्यजोनी, निज देशाच्या । चाली रीती पाळा ॥१९॥ ( पढ़ तेरावें चाल-माझी गांधी टोपी छान ) नाहीं न्याय जगी दिसणार | रे । कटिण दिवस येणार ॥ धृ ॥
पान:लोकमान्य मेळा १९२३ ची पद्यावली.pdf/१२
Appearance