पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ राजद्रोहाचा तिसरा खटला २७ पण त्या पूर्वी खटल्याला कारणीभूत होणारी व्याख्याने व इतर व्याख्याने देताना व चळवळी करितानाहि टिळकानी ते थोडे बहुत हेरले होते हीहि गोष्ट काही खोटी नाही. राजद्रोहाचा कायदा फार व्यापक आहे ही गोष्ट टिळकांच्या ध्यानात होती. तथापि कायद्याचे हे स्वरूप लक्षात बाळगूनच आपण नेहमी लिहितो व चोलतो असा त्याना आत्मविश्वास असे. मी करितो ती एक प्रकारे तारेवरील कसरत असते. पण जगून वाचून जिंकावयाचे तर अशी कसरत केल्याशिवाय भागत नाही. कायद्याची सीमा भिडविली पाहिजे पण संभाळलीहि पाहिजे. स्पष्ट व आवेशाने तर लिहिलेच पाहिजे पण शक्य तेथवर कायद्यात न सांपडेल अशा बेतानेच लिहिले पाहिजे. खेळात तडफ दाखविली पाहिजेच पण गाभळून गेल्यावर किंवा मार खाल्यावर खेळ बिघडतो व हरलाहि जातो ही गोष्ट ते आपल्या सहायक संपादक- वर्गाला नेहमी परोपरीने समजावून सांगत. येवढेच नव्हे तर एखादे वेळी एखाद्याने मोठा रसभरित आवेशयुक्त व वाचकाना खूप खमंग वाटून वाहवा होण्यासारखा लेख लिहिला तर ते त्याची अंतस्थपणे वाहवा करीत, मनातून त्याच्या आवेशाचा गुण घेत, पण त्याला वळण लावण्याकरिता त्याच्या तोंडावर त्याला नावे ठेवीत आणि त्याचे दोष त्याच्या कानावर जावे म्हणून त्याच्या पश्चात् त्याच्या स्नेही मित्राजवळ गुणदोषमिश्रित अशी त्याच्यावर टीका करीत. स्वतः टिळकांच्या लेखाविषयी कोणालाहि केव्हाही असाच अभिप्राय द्यावा लागे की लिहिताना बोलताना राजद्रोहाचा कायदा ते मनात जागता बागवीत. डॉक्तर लोक तोंडाने रोग्याशी व परिचारकाशी बोलत असता त्यांचा हात नाडीवर असतो व ते तिचे ठोकेहि कदाचित मोजीत असतात. तोच प्रकार वक्ते टिळक व संपा- दक टिळक यांचा असे. त्यांच्यावरील तीनहि खटल्यात स्वतः त्यांचे असे जे लेख होते ते कायद्याच्या मर्यादेत होते हे सर्वांना मान्य आहे. आणि पहिल्या दोन खटल्यासंबंधाने त्यांचे असे निश्चित मत होते की त्या खटल्याला खरे कारण त्यांचे किंवा इतरांचेहि लेख नसून महाराष्ट्रात व बाहेर झालेले राजकारणाच्या प्रकरणा- तले खून हेच होय. १९१४ साली हे खुनाचे वातावरण शिल्लक उरले नव्हते. आणि वातावरण नसता नुसत्या आग्रहाने किंवा तत्त्वप्रेमाने कोणाला भरीला घालावे असा टिळकांचा स्वभाव नसल्याने त्यानी स्वतःच अत्याचारनिषेधक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. महायुद्ध सुरू झाल्यामुळे केवळ युद्धविघातक नव्हे असा राजकारणी उपदेश कोणी कितीहि केला तरी तो यावेळी चालण्यासारखा आहे असे टिळकानी ओळखले होते. पण या वेळी जी चळवळ होईल ती अवश्यमेव नेहमीहून काही वेगळ्या स्वरूपाची होईल असे कोणालाहि उघड दिसत होते. युरोपात चिरडून टाकलेल्या चिमुकल्या मित्रराष्ट्रांची कड घेऊन इंग्लंडने स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाचे निशाण उभारले होते. कोणी कोणाच्या राज्यात राहावे किंवा स्वतःच्या राज्यातहि कोणत्या प्रकारची राज्य- घटना चालू करावी या विषयी हरएक राष्ट्राला स्वतंत्रता असावी या तत्त्वाचा