पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ पुणे २ जुलै १९१७ तुम्ही म्हणता तशी सरकारी दप्तराची सर्वसाधारण तपासणी करण्याची परवानगी कोणालाहि देता येणार नाही. नाशिकच्या खटल्यात ज्यानी सरकारतर्फे साक्षी दिल्या त्या तशाच आताहि देण्यास ती मंडळी तयार आहेत काय इतकेच पोलिस अधिकाऱ्यानी पाहिले आहे. पण ज्या अर्थी तुम्ही याला हरकत घेता त्या अर्थी फक्त साक्षीदाराचे नावगाव पत्ता इतक्यांचीच माहिती यापुढे द्यावयाची असे सरकारने ठरविले आहे. कमिशनपुढील पुरावा रॉबर्टसन यांचे टिळकाना उत्तर पुणे ५ जुलै १९१७ सरकारी दप्तराची सर्वसाधारण तपासणी (अर्थात वादाच्या मुद्यावद्दलहि) करता येणार नाही असे तुम्ही लिहिता म्हणून खालील विशिष्ट कागदपत्रांचीच मागणी करीत आहे. टिळकांचे रॉबर्टसन यास पत्र (१) दामोदर चाफेकर याचे आत्मचरित्र व ब्रुइनसाहेबापाशी त्याने वेळोवेळी दिलेल्या जवान्या. (२) नाशिकच्या खुनानंतर दोन तीन महिन्यातील पोलिस अधिका- ज्यांच्या डायऱ्या. अहवाल. (३) नाशिक येथे १९०६ च्या गणपती उत्सवात मी गेलो असता माझ्या हालचालीसंबधाने रिपोर्ट असलेल्या पोलीस डायन्या. (४) १८९० ते १८९७ व १९०५ ते १९९० मधील वार्षिक रिपोर्ट. (५) १८८८ ते १९०० या सालातील गोरक्षण मंडळ्यासंबंधी पोलिस (६) चिरोल याना दाखविलेले सर्व कागदपत्र. १) पोलीसच्या संग्रही असलेले माझे सार्वजनिक चरित्र. (८) पुणे व नाशिक येथे झालेल्या खुनानंतर तीन महिन्यांच्या आत पोलीसानी पाठविलेल्या बातम्यांचे अहवाल, (९) १९०१ १९०५ व १९०७ यामधील कोल्हापूरमध्ये माझ्या घडलेल्या हालचालीचे रिपोर्ट, निदान इतक्या कागदपत्रांची पहाणी करण्याची परवानगी मिळावी.