पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वैशिष्ठे: | • एकूण ३५ पैकी ४ आदिवासी जिल्ह्यांमध्ये प्रमाण ९५० किंवा अधिक आहे. १३ जिल्ह्यांचे ९०० ते ९५० प्रमाण आहे. • १६ जिल्ह्यांचे प्रमाण ८५० ते ९०० आहे. २ जिल्ह्यांचे म्हणजे बीड आणि जळगांव ८५० पेक्षा कमी आहे. गडचिरोली जिल्ह्याचे सर्वाधिक म्हणजे ९६१ आणि बीड जिल्ह्याचे सर्वात कमी म्हणजे ८०७ इतके प्रमाण आहे. देशाचे प्रमाण ९१९ आहे तर महाराष्ट्राचे प्रमाण ८९४ इतके खालावले आहे. जम्मू काश्मिरनंतर लिंग गुणोत्तराचे प्रमाण कमी करणा-या राज्यांमध्ये महराष्ट्राचा वरचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात स्त्री-पुरूषांचे प्रमाण प्रौढ नागरिकांमध्ये ९२९ आहे. बालिकांचे प्रमाण मात्र ८९४ इतके खालावले आहे. बालिका - बालक लिंग गुणोत्तर हे मागील ६ वर्षांतील परिस्थिती दर्शवित आणि म्हणून हे प्रमाण समजून घेणे महत्त्वाचे आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात बालक-बालिकांचे प्रमाण ७७९ इतके कमी आढळले. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा आणि सिंदखेडराजा येथेही हे प्रमाण ७९९ आणि ७७१ अनुक्रमे इतके कमी आढळले आहे. बीड जिल्हा हा बालिका लिंग गुणोत्तर कमी असणा-या देशातील १० जिल्ह्यांपैकी एक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ४, उत्तर महाराष्ट्रातील ४, मराठवाड्यातील ८, विदर्भातील २ या १८ जिल्ह्यांमधील स्थिती चिंताजनक आहे. स्वत:ला पुरोगामी समजणा-या महाराष्ट्राची ही सामाजिक बाजू भितीदायक आहे. ...१३...