पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रश्न ५- लिंग गुणोत्तर आणि जनगणनेचा अहवाल काय दर्शवितो? ० ते ६ वर्षाच्या मुलींची संख्या x १००० बालिकांचे प्रमाण = - ० ते ६ वर्षाच्या मुलांची संख्या सर्वसाधारणपणे निसर्गत: १००० मुलांच्या प्रमाणात ९५० ते ९७० मुली जन्माला येतात. यापेक्षा हा दर कमी झाल्यास त्यामध्ये काहीतरी अनैसर्गिक घटकांची शक्यता असते. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे बनते. पण तसे घडताना दिसून येत नाही. ० - ६ वयोगटातील दर हजार मुलांमागे असणारी मुलींची संख्या मोजून लिंग गुणोत्तर काढलं जातं. भारतामध्ये हे गुणोत्तर दिवसेंदिवस विषम होत आहे. सन १९६१ मध्ये ९७६ मुली पासून २००१ मध्ये ९२७ पर्यंत हे प्रमाण कमी झाले आहे. जगभरातले अनुभव पाहता नैसर्गिकपणे लिंग गुणोत्तर ९५० हून जास्त असायला हवे. ही तफावत पाहता गर्भलिंग निदान आणि मुलींकडे केल जाणारं दुर्लक्ष यामुळे मुलींची संख्या घटत आहे असे दिसते. जेव्हा जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर काढलं जातं (दर हजार मुलांमागे जन्माला येणा-या मुलींची संख्या) तेव्हा जन्माच्या आधी केलं जाणारं गर्भलिंग निदान उघडपणे कळतं. सँपल रजिस्ट्रेशन सिस्टिमच्या आकडेवारीनुसार २००५-२००७ सालचं जन्माच्या वेळचं लिंगगुणोत्तर हजार मुलांमागे ९०१ मुली असं होतं. | जन्माच्या वेळच्या लिंग गुणोत्तरावरून प्रसवपूर्व गर्भलिंग निदान होत । असल्याचं स्पष्ट होतं, तरी देशभरासाठी आणि जिल्हापातळीवरील आकडेवारी कळत असल्याने ०-६ वयातील लिंग गुणोत्तर जास्त प्रमाणावर मान्य केलं जातं. ...११...