पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आपल्या सेंटर मध्ये किंवा कक्षात येणारे स्त्री पुरुष त्यांच्या जीवनसाथी बरोबरच्या नातेसंबंधात कुठल्या पायरीवर आहे हे ओळखण्यासाठी हिंसाचार चक थियरीचा उपयोग होतो. खूप वेळा काल तावातावाने बोलणारी, काहीही करा पण माझ्या नव-याला शिक्षा

करा असे म्हणणारी स्त्री दुस-या दिवशी आपल्याला येऊन शांतपणे सांगते की, ताई माझा अर्ज थांबवा बर का, काल रागाच्या भरात तुम्हांला काय काय सांगितले काय माहिती, माझं ही जरा चुकलेच, आधीच ते कामावरून दमून आले होते, बोलले असतील चिडून पण मी कशाला तोंडी लागायचे? आपण तर पाहातच राहतो, अचानक काय झालं हेच कळत नाही. आपण समजुन घेतले पाहिजे की आता त्यांच्यात हनीमून स्टेज सुरू आहे आपल्या स्त्रीची ही स्थिती समजली की तिच्या बरोबर काम करणे सोपे जाते. पहिल्या स्टेजमध्येच स्त्री आपल्याकडे आली असेल तर तिला मारहाण होऊ नये यासाठी ती काय काय करू शकते म्हणजे तिची पूर्वतयारी करून घेऊ शकतो. तिची केस हिस्ट्री तिने लिहावी यासाठी तिला तयार करू शकतो. याच काळात महत्वाचे कागदपत्र सुरक्षित जागी ठेवण्यासाठी तिला सांगू शकतो, म्हणून हे हिंसाचाराचे चक्र समजणे कार्यकर्त्यांना आवश्यक आहे.

प्रकरण सातवे
कार्यकर्तीची किंवा कार्यकर्त्यांची भूमिका

 हिंसाचार नक्की थांबतो, तो थांबवता येतो हा विश्वास आधी आपण आपल्यात वाढवला पाहिजे. मनुष्य जेव्हा रानटी अवस्थेत होता तेव्हा अग्नी टिकवण्यासाठी, समूहाची जबाबदारी म्हणून स्त्रीया घरात राहत असत. आता आपण हवा तेव्हा, हवा तसा, हवा तिथं आणि हवा तेवढा अग्नी प्रज्वलित करण्याचे शास्त्र शिकलो आहे. मग स्त्रियांना घरात डांबण्याचं कारण काय? हा प्रश्न आपल्या डोक्यात निर्माण होऊ लागला की त्यावरचे उपाय डोळ्यासमोर येण्याची शक्यता वाढते. त्यापैकी काही उपाय उदाहरणा दाखल खाली दिले आहेत.

 १. कुठलाही किंवा कसाही हिंसाचार हा कायद्याने गुन्हा आहे हे आधी आपण पटवून घेतले पाहिजे, मान्य केले पाहिजे. आपण हिंसाचाराच्या विरोधात आहेत हे आपल्या वागण्या बोलण्यातून सतत व्यक्त झाले पाहिजे हिंसाचार करणा-या व्यक्तीच्या जाणिवपूर्वक लक्षात आणून दिले पाहिजे.

 २. मानसिक आधार - हिंसाचार झालेल्या स्त्रीला प्रथम दिलासा द्या की, ती योग्य जागी आली असून तिला सर्व प्रकारचे सहाय्य मिळेल, तिच्यावरचा हिंसाचार प्रयत्नांनी थांबेल.

 ३. वैद्यकिय उपचार - तिची मानसिक तयारी असेल तरी, आणि मानसिक तयारी नसेल आणि उपचाराची आवश्यकता भासत असेल तर तिची उपचारासाठी मानसिकता तयार करून प्रथम तिच्या उपचाराची व्यवस्था केली पाहिजे. जो काही उपचार घेतला


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....३८