पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुरुषाचाही एकाच पुरुषाशी किंवा स्त्रीशी शारीरिक संबंध) या संकल्पना जन्माला आल्या. जोपर्यंत पुरुषाच्या डोक्यातली माझी जमिन ही मालकी हक्काची भावना तशीच माझी जोडीदार जिच्या बरोबर फक्त मीच संबंध ठेवेन म्हणजे मी म्हणेल ते धान्य आणि माझच मुल हया भावना निर्माण झाल्या नव्हत्या तोपर्यंत सर्व संमतीने शेती आणि पुढच्या समूहाचा जन्म दोन्हीही प्रक्रिया सुरळीत सुरू होत्या.या भावनांच्या उदयाने स्त्रीयांच्या स्वतंत्र व्यक्ती म्हणून असलेल्या अस्तित्वावर, संचारावर बंदी आली. या बंदीचे नितीनियम लादण्यात आले.

२. पौराणिक काळ :- या काळा पर्यंत फक्त मुल जन्माला घालण्यापर्यंतच ज्ञानाची वाढ झाालेली होती. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या गर्भनिरोधकाचा शोध न लागल्यामुळे निसर्गतः स्त्रीचे मासिक पाळी चक सुरू असे पर्यंत गरोदर अवस्था सातत्याने येत असे. स्त्रीयांच्या संचारावर आलेले निबंध हे 'गरोदर पणातली काळजी असे कारण पुढे करून सुरू केलेले असल्यामुळे स्त्रीयांनी पहिल्यांदा ते आचरणात आणले. त्यामागचे सत्ताकारण (पावर पॉलिटिक्स) लक्षात आल्यानंतर मात्र काही स्त्रियांनी हे निबंध नाकारले. त्यामुळेच ज्या काळात फक्त पुरूष शास्त्र शिकत त्याकाळात गार्गी, मैत्रेयी किंवा कात्यायनी सारख्या विदुषी वेदशास्त्र शिकल्या आणि दरबारात आपले पांडित्य सिद्ध केलं. 'गार्गी हे नाव आपण कायमच ऐकतो. त्यांचा एक निकाल खूपच काही सांगून जाणारा आहे म्हणून सविस्तर.....

 एकदा दरबारात एका वादविवाद सभेत दोन पंडितांमध्ये विदवान कोण हे ठरविण्याची जबाबदारी गार्गी वर सर्व संमतीने आली. वादविवादाचे तोपर्यंत असलेले सर्व निकष लावूनही दोघेही सारखेच जिंकत होते. शेवटी विदुषी गार्गीने दोन चाफ्याच्या फुलांच्या माळा दोघांच्या गळ्यात घालून चर्चा घडवली. शेवटी तिने एकाला विजयी घोषित केले कारण त्याच्या गळ्यातली चाफ्याची माळ कोमेजली नव्हती. दुसरा जो पंडित होता त्याच्या गळ्यातली माळ कोमेजली कारण, त्याचा त्याच्या विचारांवर विश्वास नव्हता त्यामुळे तो ओरडून स्वतःचा मुद्दा मांडून दुस-यावर दडपण आणत होता. त्यामुळे त्याच्या शरीरात जास्तीची उर्जा निर्माण झाल्यामुळे फुलं कोमेजली. आपला विचार योग्य असला तरि तो शांतपणे मांडला पाहिजे, ऐकणा-याला तो विचार आत्मसात करायला संधी दिली पाहिजे, त्यानंतरही त्याला पटल नाही तर पटण्याच त्याच स्वातंत्र्य आणि त्याला पटल नाही हे वास्तव सहज स्विकारल पाहिजे हे तत्वज्ञान गार्गीने मांडले ही तिची समाजाला दिलेली मोठी देणगी आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे त्या दोन पंडितांपैकी हारलेला तिचा नवरा असूनही निर्णयावर कुठेही त्याचा परिणाम होऊ न देण्यासाठी आवश्यक निःस्पृह, न्याय बुद्धीचा नमुनाच तिने दिला

३. ऐतिहासिक :- झाशीची राणी, आहिल्याबाई होळकर, राणी ताराबाई, चॉदबिबी इ. यासर्व नेत्या काही ना काही कारणाने सत्तेत आल्या. राज्याचं नेतृत्व केलं आणि एक आदर्श नमुना तयार करून ठेवला. ज्यात राज्यकर्त्याने नागरिकांप्रती जबाबदार


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....१७