पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

• ऑक्सफर्ड ई.डी.- ओईडीआय, व्हॉल्यूम जी, 1900 यात अधिकृत रित्या जेंडर म्हणजे काईंड असं छापलं गेल.

• अॅरिस्टोटल- या ग्रीक तत्ववेत्त्याने जेंडर या शब्दाचा वापर मस्क्युलाईन, फेमिनाईन अॅण्ड न्यूटर हे मनुष्यप्राण्यातील जीवशास्त्रीय भेद दाखवण्यासाठी केलेला आढळतो. हया भेदामागची मानसिकता दाखवण्यासाठी हया शब्दाचा उपयोग केलेला नाही.

• पाश्चिमात्य देशांमध्ये जेव्हा संघटितपणे, सामूहिकरित्या स्त्रीवादाची मांडणी झाली; त्या पहिल्या टप्प्यात स्त्रीयांचे कामगार म्हणून अधिकार, त्यांचे वेतन, कामाचे तास हेच विषय अग्रक्रमावरती होते. स्त्री वादी चळवळीच्या दुस-या टप्प्यात म्हणजे साधारण 70 च्या दशकात जेंडर ही संकल्पना, स्त्रीची स्त्री म्हणून आज असलेली भूमिका ही निसर्गतः नसून ती पुरूष वर्चस्ववादी समाजाने हेतु पुरस्सर तयार केली आहे; ही मानसिकतेची घडण ही एक प्रक्रिया आहे ही मांडणी झाली. स्त्रीयांची आजची स्थिती ही समाजातील लिंगभेदामुळे आहे हे जगभरातल्या विविध स्त्री वादी चळवळींनी मांडले.

• जॉन अॅकनर थिअरी- प्रत्येक व्यक्तीची समाजात लिंगभेदा संबंधित मानसिकतेची जडणघडण होते. त्यासाठी कुटुंब, राज्य, श्रमाच मार्केट, धर्म (वर्तणूकी संदर्भात), विविध सत्ता यांचा वापर होतो. या घटकांव्दारा प्रत्येक व्यक्तीच्या वर्तणूकीला/शारीरिक कृतीला मान्यता व स्थान दिले जाते, त्यातून त्या त्या व्यक्तीची मानसिकता घडत जाते. त्यासाठी संकेत (सिंबॉलस्), भाषा, आदर्श, ड्रेस कोड, प्रसार माध्यमं याव्दारे पुढच्या पिढीला जेंडर एक्सप्लेन केले जाते, त्यासाठी तयार केलं जाते. जे लोक ही मानसिकता मान्य करतात त्यांचा गौरव करून या मानसिकतेचा विचार पक्का/रिएनफोर्स केला जातो. जे लोक ही प्रकिया नाकारतात, त्यांना कसे नाकारायच/विरोध करायचा याचीही तयारी करवून घेतली जाते. सामाजिक संरचना निर्माण करण्यासाठी सातत्याने चालणारी ही एक मुलभूत प्रक्रिया आहे. समाजाने घालून दिलेल्या प्रथा पाळणा-यांना मान्यता आणि न पाळणा-यांना नकार असल्यामुळे समाजाने ठरवून दिल्याप्रमाणे

भूमिका करणे म्हणजेच आपला परिचय हे इतक निश्चित, सहज घडतं की जेंडर म्हणजेच सेक्स अस समीकरण बनलं आहे.

• ज्युडीथ बटलर :- सोशल कन्स्ट्रक्शन मार्फत स्त्रीवर नियंत्रण केलं जातं कारण जेंडर ही राजकिय संकल्पना आहे.

• सिमांत दी बुवायर (Simone de Beauvoir) :- "स्त्री ही स्त्री म्हणून जन्माला येत नाही. ती एक व्यक्ती म्हणून जन्मते. मासिक पाळीनंतर जीवशास्त्रीय दृष्टया ती निर्मितीक्षम व्यक्ती बनते. पण समाजात स्त्रीला तिच्या जन्मा पासून तर मृत्यू पर्यंत समाजाला अपेक्षित असलेल्या प्रतिमेसाठी तयार केले जाते. याचा अर्थ स्त्री जन्माला येत नाही तर समाज सामाजिकदृष्टया तिला जन्माला घालतो. त्यासाठी समाज तिची गरज काय आहे हे विचारात न घेता तिला शिकवत जातो." अस अभ्यासपूर्ण विश्लेषण


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....१५