आलेख काढता येईल. काही कथामध्ये कथेचे तंत्र सांभाळण्याचा प्रयत्न पहिलेपणाची जाणीव देतो. परंतु 'वाधा' आणि 'आति' या कथातील काल्पनिकता सोडली तर बाकी सर्व कथा 'हकीकती' आहेत. स्वतः ऐकलेल्या, अनुभवलेल्या किंवा पाहिलेल्या त्या 'हकीकती' आहेत. म्हणूनच त्या वरवरच्या व केवळ काल्पनिक नाहीत. 'केवळ योगायोग'चे पांघरुन घालून मी या मानवीजीवनातील सत्याचे अवमूल्यन करु इच्छित नाही. शद, शैली, आणि तंत्र यांची सफाई (काँक्रीट) फक्त माझे. त्यातील जे गुणदोष असतील त्यासाठी माझा पदर तुमच्यापुढे पसरलेला आहे. सहृदय वाचक तुम्ही माझ्या या कथा संग्रहास योग्य न्याय व दाद द्याल याचा मला विश्वास आहे. या कथा संग्रहातील कशा वैशिष्ट्ये म्हणून काही असतील; परंतु कथासंग्रह आकारला आल्यानंतर मला जाणवलेलं वैशिष्ट्य हे की, एक-दोन कथा सोडल्या तर या संग्रहातील बहुतेक कथात चिरंतन सत्य उमलून यावे त्याप्रमाणे स्त्रीचे स्त्रीपण उमलून आलेले आहे. माझ्याही नकळत हा आकाराला आलेला हा कलानुभव आहे. जो मला 'लागीर'च्या स्वरुपात जाणवला - रसिकवाचक, आपल्याही अभ्यास-आस्वाद - अभिरुचीनुसार आपणास या कथासंग्रहात काही गुण-दोष जाणवतील त्याचे पडसाद समजून घेण्यास मी उत्सुक आहे. सौ. नलिनी महाडीक
पान:लागीर.pdf/६
Appearance