पान:लागीर.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीरबद्दल थोडेसे रसिक वाचक, 'लागीर' हा माझा दुसरा कथासंग्रह तुमच्या हाती देताना मला मनस्वी आनंद होत आहे. वास्तविक माझ्या 'रानवारा' या पहिल्या कथासंग्रहानंतर लवकरच 'लागीर' प्रसिद्ध व्हायला हवा होता. 'रानवारा'च्या प्रकाशनाच्या वेळीच मी तसे जाहीर केले होते. परंतु संकल्प आणि सिद्धी यात जसे अंतर असते तसेच निर्मिती आणि प्रसिद्धी यातही असते. असा अनुभव मला 'लागीर' च्या बाबतीत आला. विलंबाची खंत काळानुसार वाढत गेली. ही अनुभूती असहय आणि उदास करणारी होती. 'लागीर' राहूनच जाणार या निराशाजनक जाणीवेतून तब्बल आठ वर्षानंतर नकारात्मक उर्मीतून 'लागीर'च्या छपाईची सिद्धता केली गेली. आणि सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात आली की, या कथासंग्रहाचे शीर्षक पूर्वीच जाहीर केल्याने ते बदलता येणार नव्हते. 'रानवारा' मध्येच समाविष्ट व्हाव्यात असे वाटूनही ज्या कथा त्यातून वगळल्या गेल्या त्या काही कथा आणि नंतरच्या काही अशा दहा कथांचा समावेश मी 'लागीर' मध्ये केला. लागीर, आॠित आणि वळणावरुनी या तीन कथा माझ्या लिखाणाच्या अगदी सुरुवातीच्या काळातील आहेत. 'लागीर' ही शीर्षक कथा भूतपिशाच्च कल्पनेवर आधारीत आहे. त्याच कल्पनेवर आधारीत अशा 'बाधा' आणि 'झुटिंग' या दोन कथाही मी या संग्रहात जाणीवपूर्वक सामाविष्ट केल्या. १९७४ ते १९८८ पर्यंतच्या निवड न करता फक्त सुव्यवस्थित लिहिलेल्या व पूर्वप्रसिद्धी मिळालेल्या कथा मी या संग्रहात समाविष्ट केल्या. त्यावरुन माझ्या कथाविकासाचा